सायकलिंग क्लब,लोणावळा ने लोणावळा ते गोवा सायकल रॅली द्वारे केली जनजागृती

मावळ मराठा न्युज :-लोणावळा सायकलिंग क्लब लोणावळा हे नेहमीच समाजाला पर्यावरण संवर्धन व निरोगी आरोग्याचा संदेश देत असतो. या वर्षी सायकलिंग क्लब लोणावळाचे सदस्य श्री.भरत भाऊ भरणे व श्री. नितेश कुटे यांच्या संकल्पनेतून व्यसन मुक्त समाज “सायकल चालवा निरोगी रहा” असा संदेश देत लोणवळा ते गोवा असा २३ डिसेंबर ते २५ डिसेंबर सायकल रेली आयोजीत करण्यात आली. पहिला दिवस लोणवळा ते कराड असा सायकल प्रवास करुन तेथील लोकाना सायकल चालविण्याचे फायदे बाबत संदेश देण्यात आला . दुसरा दिवस कराड ते कोल्हापुर राधानगरी मार्गे दाजीपूर १५० कि. मी. प्रवास करुन प्रवासात लागणारी गावातील लहान मुले याना सायकल चालवण्यासाठी प्रेरित केले. या मधे काही पुरुष मडळीं यानी लहानपणी च्या सायकल चालविण्याची आठवण सगितली व परत आम्ही सायकल चालवणे सुरु करतो असा विश्वास ही दर्शविला.तिसरा दिवस गोवा येथील युवा वर्ग समोर ठेऊन येणाऱ्या ३१ डिसेंबर ला कोणतही व्यसन न करता साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. समृध्द भारत सुदृढ भारत ही संकल्पना राबविण्यासाठी एक पाऊल आपले लोणवळा सायकलिंग क्लब नेहमी टाकत असते . यासाठी लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई यांचे नेहमी मार्गदर्शन लाभत असते संकल्प नशामुक्ती अभियान यांनी त्यांनी राबवले आहे.या अभियानासाठी सायकल क्लब महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेर अशा रेली चे आयोजन करत असते.या रॅली मधे सर्व वयोगतील सदस्य सहभागी झाली होती. श्री. भरत भरणे, श्री. नितेश कुटे, श्री कैलास कडूस्कर, डॉ. प्रविण पंडीत लोणवळा आणि विट्ठल लोंढे, अक्षय अंबेकार पुणे हे सहभागी झाले होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page