आजचे पर्यावरण,वृक्षारोपण,संरक्षण म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय-सुर्यकांत मुळे

मावळ मराठा न्यूज़ :-पिंपरी येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने संत तुकाराम नगर येथे कौमी सप्ताह दिनानिमित्त पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.कौमी सप्ताह दिन हा राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो, अल्पसंख्यांक कल्याण, भाषिक सुसंवाद, दुर्बल घटक दिन, पर्यावरण संवर्धन दिन, महिला दिन अशी विविध दिन या सप्ताहात साजरे केले जातात, या सप्ताहात राष्ट्रीय एकात्मितेची शपथ देऊन ,मिरवणूक, चर्चा, संमेलने, चित्रपट प्रदर्शनाने असे विविध कार्यक्रम या सप्ताहात राबविले जातात.जागतिक पर्यावरण हे पाच तारखेलाच केला जातो असे नाही हवेचे प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, जागतिक तापमान वाढ यांच्यासाठी जनजागृती पर्यावरण हे व्यासपीठ आहे. याचा मुख्य उद्देश पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण हाच असल्याचे जेष्ठ साहित्यिक ,विचारवंत सूर्यकांत मुळे यांनी सांगितले.त्यांनी सांगितले कि नागरीकांनी जगण्यासाठी, रस्ता वाढीसाठी वृक्षतोड केली आहे प्रत्येकाने ठरवले पाहिजे माझ्या मुळे वृक्षतोड, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आज जगामध्ये पृथ्वीचे तापमान वाढत आहे, दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळ चालला आहे, नद्यांच्या प्रदूषणात वाढ होऊन जलचर प्राण्याचे अस्तित्व धोक्यात येऊन त्यांचा मानवी आरोग्यावर परिणाम होत चालला आहे, कृषी क्षेत्रावर परिणाम होत चालला आहे त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था च्या माध्यमातून माझी वसुंधरा पर्यावरण राबवण्याचे शक्तीचे करावे यासाठी ग्रामविकास व नगर विकास विभागाने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन प्रमुख पाहूणे व गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी केले आहे . कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजन अभावी प्राण गमवावे लागले, त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावून जगवले पाहिजे फक्त पर्यावरण दिवशी वृक्षारोपणाचा देखावा न करता वर्षभर झाडे लावून जगवली पाहिजेत आणि देशी झाडे लावली पाहिजे पाहिजे असे प्रमुख पाहुणे व गुणवंत कामगार आण्णा जोगदंड यांनी केले.रोहिणी मेश्राम यांनी सिमेंटच्या जंगलामुळे सूर्य आग ओकतोय ,पशुपक्षी नष्ट होताना दिसत आहेत,,वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे आवाहन यावेळी केले आहे.यावेळी कामगार कवी शामराव सरकाळे यानी इंद्रायणी काठी ,माझ्यामध्ये होणाऱ्या प्रदूषणासाठी या अशी आर्त हाक दिली.केंद्र संचालक अनिल कारळे यांनी आभार मानले.यावेळी जेष्ट विचारवंत ,साहत्यिक सुर्यकांत मुळे,प्रमुख पाहुणे आण्णा जोगदंड, केंद्र प्रमुख आनिल कारळे,शैलेजा आवडे,कामगार प्रतिनिधी किशोर पुजारी, गोरखनाथ वाघमारे, नवनाथ कदम, रोहिणी मेश्राम, कवी शामराव सरकाळे,गुंगा क्षिरसागर ,काळुराम लांडगे, शंकर नाणेकर, बाबुराव बिराजदार उपस्थित होते,

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page