तळेगाव जनरल हॉस्पिटल रिक्रिएशन हॉल तळेगाव दाभाडे येथे तालुकास्तरीय जागतिक दिव्यांग दिन सप्ताह साजरा

मावळ मराठा न्यूज़ :-तळेगाव,जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे, पंचायत समिती मावळ समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण विभाग व मायमर वैद्यकीय महाविद्यालय , डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून आज दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी तळेगाव जनरल हॉस्पिटल रिक्रिएशन हॉल तळेगाव दाभाडे येथे तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. सदर वेशभूषा स्पर्धेमध्ये २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी छान प्रतिसाद दिला. वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण इनरव्हील क्लबच्या मुग्धा जोरवेकर, भारती शहा आणि अल्पना हुंडारी यांनी केले .सदर वेशभूषा स्पर्धेसाठी मायमर वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, उपअधीक्षक डॉक्टर दत्तात्रय गोपाळघरे, अस्थिरोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संतोष बोरकर, डॉ. प्रशांत कामत , मेडिकल सोशल वर्कर श्रीम अश्विनी वनारसे, सांगिसे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुहास धस, खांडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री केदार उपस्थित होते. . मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. जागतिक दिव्यांग दिन सप्ताह वेशभूषा स्पर्धा नियोजन समावेशित शिक्षण विभागाचे विशेष साधन व्यक्ती श्रीम शीतल शिशुपाल, विशेष शिक्षिका श्रीम स्मिता जगताप, सौ साधना काळे, श्रीम लता वनवे, श्रीम सुमित्रा कचरे, श्रीम शकील शेख यांनी केले. तसेच विषय साधन व्यक्ती श्रीम सविता पाटील यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page