बाळूमामाच्या उत्सवानिमित्त सायली बोत्रे यांनी दुर्गम भागातील महीलासाठी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन





मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,बाळूमामाच्या उत्सवाच्या निमित्ताने दुर्गम भागातील महिलांच्या आनंदाकरिता भाजपा महिला आघाडी मावळ तालुका व महिला आघाडी अध्यक्षा सायली ताई बोत्रे आयोजित खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमास महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला , दुर्गम भागात पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाल्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता सायली ताई बोत्रे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना बोलल्या,माझ्या दुर्गम भागातील मैत्रिणीच्या आनंदासाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला.माझ्या आयुष्यातील सगळ्या सुंदर अविस्मरणीय कार्यक्रम या ठिकाणी पार पडला माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या चेहऱ्यावरील आनंद हेच या कार्यक्रमाचे यश.कधीही व्यासपीठावर न आलेल्या माझ्या या दुर्गम भागातील मैत्रिणी कायम कामाच्या गाड्यांमध्ये अडकलेल्या पण आज मात्र त्या आपल्या कामावर सुट्टी घेऊन तिथे छान छान आवरून आल्या होत्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आनंद होता.व्यासपीठावर अनेक कला त्यांनी सादर केल्या त्यांचे पारंपारिक नृत्यही त्या ठिकाणी सादर केले.अजूनही समाजामध्ये असे समूह आहेत की ती आपली संस्कृती आणि पारंपारिक वारसा जपत आहेत निसर्गाशी आपली नाळ जोडुन आहेत.हा कार्यक्रम घेण्यामागे एकच हेतू होता की माझ्या शेवटच्या घटकातील माझी माय माऊली समाजाच्या प्रवाहात आली पाहिजे. प्रत्येक महिलेला आपल्याबरोबर घेऊन जाता आले पाहिजे म्हणून महिलांनी महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले पाहिजे याचेच एक उदाहरण हा कार्यक्रमदुर्गम भागातील खेळ रंगला पैठणीचा मानकरीचा मान यशिका चौधरी यांनी पटकावला द्वितीय क्रमांकजानकी येवलेतृतीय क्रमांक किर्ती मोंगाळ चतुर्थ क्रमांक सोनाली मरगळेपंचम क्रमांक सुनिता होले सहवा क्रमांक वैशाली हिरवेसातवा क्रमांक सिता ठोंबरे तसेच प्रत्येक महीलेस अरविंद बालगुडे व सायली बोत्रे यांच्या वतीने साडी भेट देण्यात आली कार्यक्रमास लोणावळा च्या नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे ग्रामपंचायत सदस्य अरविंद बालगुडे मीना शिंदे ,सिमा ठोंबरे ,राजु हिरवे ,राजु जानकर , लक्ष्मण मरगळे ,रमेश खरात ,लहु तिडके ,दहिवली पोलीस पाटील सागर येवले वाकसई गण अध्यक्ष सचिन येवले प्रसाद भाऊ हुलावळे सदाशिव बांगर अनिल भाऊ गायकवाड आशिष भाऊ बुटाला सुजाता मेहता रावळभाभी सांगीसे उपसरपंच चंदाताई पिंगळे भाजप महिला कार्याध्यक्ष सुमित्राताई जाधव संघटन सरचिटणीस कल्याणी ताई ठाकर नाणे मावळ महिला अध्यक्ष सीमाताई आहेर भाजपा महिला उपाध्यक्ष रोहिणीताई गाडे अश्विनीताई तिकोणे अंजलीताई कडू सुप्रिया ताई शेलार सुजाताई शेलार मनीषाताई चौधरी सह महिला उपस्थित होत्या.




