लायन्स प्रांत ३२३४ डी टू च्या रोडसेफ्टीच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त १०० झाडांची लागवड

मावळ मराठा न्यूज़:- तळेगाव ,लायन्स प्रांत ३२३४ डी टू च्या- रोडसेफ्टीच्या चेअरपर्सन लायन मंदाकिनी माळवदे, लायन्स क्लब तळेगाव आणि रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन मुंबई पुणे हम रस्त्यावर वृक्षारोपणाने संपन्न. दिनांक पाच जून २०२४ रोजी मुंबई पुणे रस्त्यावरील टोलनाक्यापासून लडकत पेट्रोल पंपापर्यंत आणि डाव्या बाजूस इंद्रायणी ढाब्यापासून ते बेगडेवाडी रेल्वे रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यापर्यंत १०० वृक्ष लागवड करण्यात आली. हा प्रकल्प संपन्न होण्यासाठी डिस्ट्रिक्टच्या रोड सेफ्टीच्या लायन मंदाकिनी माळवदे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना त्यांच्या पुना गॅलेक्सी क्लबच्या लायन मीना सासने यांनी मदत केली. लायन्स क्लब तळेगावचे विद्यमान अध्यक्ष डॉ.अनिकेत काळोखे यांनी वृक्ष लागवडीसाठी लागणारे संपूर्ण सेंद्रियखत उपलब्ध करून दिले. ज्येष्ठ ला.डॉ. शालिग्राम भंडारींनी उपस्थितांना आपल्या मनोगतात तळेगाव लायन्स क्लबच्या प्रगतीचा आलेख सादर केला व या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. तळेगाव लायन्स क्लबचे ला भरत पोतदार, लायन प्रमिला वाळुंज, इनकमिंग प्रेसिडेंट ला.अनिल तानकर, सेक्रेटरी लायन सुचेत्रा लायन शेखर चौधरी,ला. प्रियंका काळोखे, ला. डॉ. केतन ओसवाल हे सर्व क्रियशिल सदस्य उपस्थित होते. या वृक्षारोपणाच्या निमित्ताने पर्यावरण संदर्भातील आपल्या कर्तव्याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी या उद्देशाने लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आभार प्रदर्शनानंतर या समारंभाची सांगता सुग्रास भोजनाने झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page