अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्याना भरपाई मिळावी,त्वरित पंचनामे करावे,मावळ तालुका,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

मावळ मराठा न्युज :- मावळ,मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे भातपीक ,विट कारखानदार, पोल्ट्री व्यवसायिक,तसेच अन्य छोटे मोठे व्यवसायिक व चालू हंगामातील रब्बी पिके यांचे अवकाळी पावसामुळे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना व छोट्या मोठ्या व्यवसायिकांना‌ लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज मावळचे तहसीलदार श्री विक्रम देशमुख यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.मा. तहसीलदार साहेबांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.या वेळी तहसिलदार साहेबांना निवेदन देताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा संघटीका सौ शैलाताई खंडागळे, सहसंपर्क संघटीका श्रीमती शादान चौधरी, तालुका संघटक शांताराम भोते, तालुका संघटक मदन शेडगे, तालुका सल्लागार रमेश जाधव,तालुका सल्लागार मारूती खोले, तालुका संघटक अशोक निकम, उपतालुकाप्रमुख युवराज सुतार, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक,‌ तळेगाव मा शहरप्रमुख दत्तात्रय भेगडे, युवासेना उपतालुका अधिकारी अक्षय साबळे,‌महिला आघाडी विभाग संघटीका शोभा चव्हाण, देहूरोड उपशहरप्रमुख संदिप बालघरे, सल्लागार देवा कांबळे, विभाग प्रमुख भरत भोते, विभाग प्रमुख उत्तम तरस, उपविभाग प्रमुख सचिन ढोरे, उपविभाग प्रमुख दत्तात्रय नाटक, किशोर कालेकर, बाळासाहेब पिंजण ,शशिकांत सपागुरु, सनी कदम शिरगाव शाखाप्रमुख शंकर गोपाळे, शाखाप्रमुख अजय भोसले व मावळ तालुका शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page