पाणी अडवले,उडवले,फिरवले आणि मध्यरात्री जिरवले तर?

मावळ मराठा न्युज :- दिनांक २ मे २०२४,पाणी अडवले, उडवले, फिरवले आणि मध्यरात्री जिरवले तर? तर महाराष्ट्र शासनाचे १,२५,००० कोटी रुपये (एक लाख पंचवीस हजार कोटी रुपये ) बचत होईल. शेतकरी आणि देशाचा विकास होईल.महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांना दररोज लागणारे पिण्याचे आणि वापरण्याचे पाणी रात्री १२ ते ६ या वेळेत नदीतून, विहिरीतून उपसावे आणि सकाळी दिवसा गावाला वितरित करावे. आणि हे फार सोपे पण आहे. गावाच्या लोकसंख्या पाहून किती पाणी दररोज लागते तेवढी पाण्याची टाकी असावी. बाजारात टायमर मिळतो. पंप आपोआप चालू बंद करण्यासाठी लेव्हल कंट्रोलर मिळतो. आपोआप रात्री मोटर चालु होईल आणि टाकी भरली की बंद होईल. आणि MSEB कडे TOD प्रकारचा मीटर पण असतो जो प्रत्येक तासाला वीज किती वापरली ते सांगतो. आपल्याला तर रात्री १२ ते सकाळीं ६ या वेळेतच पंप वापरायचा आहे.महाराष्ट्रात २८६०० ग्रामपंचायत आहेत. एका ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा पंप ५ एचपी पकडला तरी २८६००*५=१,४३,००० HP वीज वापर रात्रीवर जाईल.असेच नगर पंचायत, नगर पालिका, महानगरपालिका, शाळा, कॉलेज, शासकिय कार्यालय, औद्योगिक कंपन्यांनी, हौसिंग सोसायटीतील लोकांनी अशाच प्रकारे पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचे नियोजन करावे.रात्री वीज निर्मिती होवून वाया जाते म्हणुन असे करणे आवश्यकच आहे.यातूनच पुढे पूर नियंत्रण आणि दुष्काळ निवारण सहज साध्य करता येईल. आपल्या महाराष्ट्रात जून मध्ये पाऊस सुरु होतो. ८ ते १५ दिवसात संपुर्ण महाराष्ट्र व्यापून टाकतो. त्याच काळात शेतीचे पंप, एसी, कूलर, फॅन बंदच असतात. म्हणजे विजेचा तुटवडा नसतोच. याच विजेचा वापर करून “अडवलेले पाणी उडवून आणि फिरवून जिरवले तर फायदा होइल की नाही? जिथे पूर येतो तेथील पाणी जिथे दुष्काळ पडतो तिथे फिरवले तर जिरेलच ना!पाणी फिरवायची अजुन एक संकल्पना पाहू. बऱ्याच धरणातून धरण भरल्यावर पाणी नदीत सोडले जाते. त्यामूळे धरणाखालील गावात पुरामुळे दाणादाण उडते. हेच अतिरीक्त पाण्यातील काही भाग आधीच महिनाभर कॅनॉल वाटे दूरवर फिरवून पुरावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल काय?कल्पना करा की याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतीचे एकूण वीज पंप किती HP चे असतील? अंदाजे १० पट असावेत असे गृहीत धरले तरी १४,३०,००० HP होईल. यातली शक्य तेवढे पंप रात्री चालवले पाणी थोडे उंचावर शेत तळी तयार करून त्यात साठवले आणि दिवसा शेतकर्यांनी वापरले तर दिवसाचे होणारे भारनियमन कमी होईल की नाही?कल्पना करा की महाराष्ट्रातील औद्योगिक कंपन्यांचे एकूण वीज पंप किती HP चे असतील? प्रत्येक इंडस्ट्री ने त्यांना लागणारे पाणी रात्री उचलले आणि दिवसा वापरले हरकत कुणाचीच नसेल!वीज निर्मिती सतत होत असते. परंतु विजेचा वापर एक सारखा नसतो. रात्री वीज वापर अतिशय अत्यल्प असतो. म्हणुन सरकार काही ठिकाणी दिवसा भारनियमन करते अन् रात्री शेतकऱ्यांना वीज पुरवठा करते. वीज वापराची ही परिस्थिती कायम अशीच राहील.त्यावर मात करण्यासाठी सरकार रात्रीच्या विजेचा पुनर्वापर करण्यासाठी “पंप स्टोरेज” योजना अंगीकारते. इन्व्हर्टर सारखी “पंप स्टरेज योजना काम करत असते. महाराष्ट्रात आधीच काही ठिकाणी योजना चालू आहेत. काही ठिकाणी प्लॅनिंग चालू आहे. त्यासाठी लाखो कोटी रुपये वाया जातील. सरकारी खर्च वाचवणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे.इन्व्हर्टर म्हणजे बॅटरी सह चालणारे यंत्र. इन्व्हर्टर मध्ये वीज साठवली जाते आणि लाईट गेल्यावर साठवलेली वीज वापरली जाते. याचाच अर्थ इन्व्हर्टर वीज बनवत नाही. फक्त गरजेनुसार वीजेचा वापर करून देतो. तर या इन्व्हर्टर मध्ये एक युनिट वीज साठवून वापरण्यासाठी सव्वा ते दीड युनिट वीज साठवावी लागते. म्हणजे प्रत्येक युनिट मागे ०.३० ते ०.५० युनिट वीज वाया जाते.आणि खरी गम्मत अशी की शासनाकडे १० कोटी रुपये नाहीत म्हणून आपण इन्व्हर्टर मध्ये ९०० कोटी रुपये खर्च करतो.कशी असते “पंप स्टोरेज हायाड्रो पॉवर प्रोजेक्ट” योजना समजावून घेवू. जिथे पंप स्टोरेज योजना असते तिथे एका धरणाच्या खाली दूसरे धरण असते. वरच्या धरणातून पाणी बाहेर पडते तेव्हा वीज निर्मिती करून खालच्या धरणात साठवले जाते. आणि रात्री वाया जाणारी अतिरिक्त वीज उपलब्ध असल्याने ती वीज वापरून तेच पाणी वरच्या धरणात उचलले जाते. ही प्रक्रिया रोज चालू असते. दिवसा पाणी वीज निर्मिती करून खालच्या धरणात साठते आणि रात्री वाया जाणारी अतिरिक्त वीज वापर करून तेच पाणी वरच्या धरणात आणले जाते. जसे आपल्या घरातील इन्व्हर्टर काम करतो.महत्वाची गम्मत म्हणजे या पंप स्टोरेज योजनेतून विजेचा ४५% नाश होतो. परंतु १००% नाश होण्यापेक्षा ४५% नाश बरा म्हणून पंप स्टोरेज योजनेचे गणित मांडले जाते.ज्ञानात आणखी वाढ होईल अशी गोष्ट म्हणजे फक्त “अमेरिकेतच” ४६ पंप स्टोरेज हायड्रोपॉवर प्रोजेक्ट आहेत.तर अब्जावधी पैसे खर्च करून पाणी वर खाली करत बसण्यापेक्षा आपणच पिण्यासाठी, शेतीसाठी, वापरासाठी रात्री पाणी वर नेवून ठेवले आणि दिवसा लागेल तसे वापरले तर आपलेच पैसे वाचतील कारण सरकार पण आपलेच आहे आणि त्यातून विजेचा शुन्य टक्के नाश होतो.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page