मावळ वार्ता व्हिडिओ बातमीपत्राच्या २२ व्या वर्धापन दिन थाटात संपन्न,विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मानवरांचा गौरव



मावळ मराठा न्यूज़:- लोणावला, मावळ वार्ता चे संस्थापक दिवंगत विजय अडसूळे यांनी सुरु केलेले रायगड व पुणे जिल्हातील पहिले व्हिडिओ बातमीपत्र मावळ वार्ता नी २३ व्या वर्षात पदार्पण केले आहे.मावळ वार्ता च्या २२ व्या वर्धापन दिनी दर वर्षी विविध क्षेत्रात समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना मावळ वार्ता गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येते या वर्षी लोणावळा येथील कुमार रिसॉर्ट येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बबनराव भेगडे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार अनिल गायकवाड, कौन्सिल पट्टू वडगाव चे नगराध्यक्ष मयूर ढोरे, पत्रकारिता पुरस्कार विलास भेगडे, उद्योजक पुरस्कार गणेश काकडे, योगा पुरस्कार धनंजय डेंगळे, ग्राम गौरव पुरस्कार भाजे ग्रामपंचायत चेतन मानकर, शैक्षणिक ग्रामीण भाग संजय जगताप, शैक्षणिक शहरी भाग अनिल तोडकर, वैद्यकीय पुरस्कार डॉ. सीमा शिंदे, उत्कृष्ट शाळा पुरस्कार रायवूड इंटरनॅशनल स्कुल, आध्यत्मिक पुरस्कार ह भ प. नंदकुमार शेटे, विशेष कार्य गौरव पुरस्कार चेतन वाघमारे, आयशा हिबा व विशाल साखला यांना प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी अप्पर आयुक्त महासचिव सहकार पवन व वस्त्र उद्योग विभाग चे एस. बी. पाटील, येरवडा कारागृह चे माजी अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर, माजी पेरा कमांडो रघुनाथ सावंत, गुरुवर्य वसंतदादा खानविलकर, लोणावळा ग्रामीण सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सिने अभिनेते माधव अभ्यँकर, विजय पटवर्धन, तसेच संत तुकाराम सह. सोसायटीचे संचालक बापूसाहेब भेगडे, पीएम आर डी ए सदस्य संतोष भेगडे, सचिन घोटकुळे, लोणावळ्याच्या माजी नागराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तळेगाव माजी उपनगराध्यक्ष सुरेश धोत्रे, खोपोली उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, जेष्ठ समाज सेवक नंदकुमार वाळंज, काँग्रेस प्रदेश सचिव निखिल कवीश्वर लोणावळा मुख्याधिकारी अशोक साबळे, स्पेसलिंक केबल चे संचालक कृष्णन चिलाई, राजन राणे यांच्यासह राष्ट्रवादी मावळ तालुक्यातील अनेक पदाधिकारी भाजपाचे लोणावळा शहर पदाधिकारी, लोणावळा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मावळ वार्ता फाउंडेशचे पदाधिकारी, पत्रकार,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळ वार्ता चे संचालक संजय अडसूळे यांनी केले मावळ वार्ता चे दिवंगत जेष्ठ पत्रकार सुनील चव्हाण यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रम सुरु करण्यात आला सूत्रसंचालन बापूलाल तारे व प्रदीप वाडेकर यांनी केले आभार मावळ वार्ता फाउंडेश्नचे सल्लागार डॉ किरण गायकवाड यांनी मानले यावेळी सोल ऑफ सह्याद्री हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.अतिशय देखण्या पुरस्कार सोहळ्याला मावळ वार्ता फाऊंडेशन चे अध्यक्ष माजी नगरसेवक नासीर शेख, उपाध्यक्ष रवी सलूजा, सचिव मनीषा बंबोरी, खजिनदार भरत तिखे, सहखजिनदार संदीप वर्तक व सर्व सदस्यांनी तसेच मावळ वार्ता चॅनल च्या सदस्यांनी विशेष सहकार्य केले




