लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा नवनाथ मित्र मंडळ,वायसी क्लासेस यांच्या कालेकर मळा येथे संयुक्त वृक्षारोपण

मावळ मराठा न्युज -लोणावळा दिनांक २० जुलै २०२५ रोजी,लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा,नवनाथ मित्र मंडळ आणि वायसी क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने कालेकर मळा, लोणावळा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात गुरुपरिवारचे श्री. नंदकिशोर खंडेलवाल व प्रिया पंडित यांनी ३०० आंब्याची रोपे दान करून समाजप्रबोधनाचा आदर्श निर्माण केला. या रोपांची लागवड वायसी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी व स्वयंसेवकांनी साकारली.कार्यक्रमाची सुरुवात झाडांचे पूजन करून झाली. पूजनाचे सौभाग्य लायन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. कांताबेन ओसवाल आणि कोषध्यक्ष सौ. अश्विनी कदम व इतर मान्यवर यांना लाभले. त्यांच्या सोबत लायन्स क्लबचे सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांमध्ये – डॉ. दिलीप सुराणा, डॉ. पोपट ओसवाल, झोन चेअरमन देवेल पारेख, देवेंद्र नाळेकर, मंगेश कदम, अँड. प्रफुल लुंकड, प्रकाश जैन (ऍक्टिव्हिटी चैरमेन), रोहित थोरात, अभय जैन, डॉ. गोसावी (मनशक्ती केंद्र), श्री. देनकर, श्री. सागर कालेकर, सोमनाथ पावले, वायसी क्लासेसचे शिक्षक व विश्वस्त, ग्रामस्थ तसेच सौ. चार्मी पारेख, दीपाली गाला, यांचा समावेश होता. अध्यक्ष सौ. कांताबेन ओसवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की दरवर्षी त्यांच्या खास प्रसंगानिमित्त किमान एक झाड लावण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. याचबरोबर त्यांनी वृक्षांच्या सौरशनच्या कुंपणासाठी निधी दान केले व करण्याची घोषणा केली. या उपक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वृक्ष लावा – वृक्ष वाचवा – पर्यावरण वाचवा

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page