वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे यांची खासदार बारणे यांच्याकडे सीसी कॅमेरा बसवण्याची मागणी

मावळ मराठा न्युज -थेरगाव,२१ सप्टेंबर २०२५ रोजी खासदार फंडातून भांगरवाडीसह लोणावळा शहरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्या बाबत मावळचे लोकप्रिय महासंसद रत्न खासदार श्री. श्रीरंग अप्पा बारणे यांना शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.लोणावळ्यात होणाऱ्या वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी लोणावळा शहर व परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविल्यास वाढत्या गुन्हेगारी ला आळा बसेल या उद्देशाने लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे यांनी मावळ चें खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना सदर सीसी कॅमेराबद्दल लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. याबाबतीत खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी देखील आपल्या खासदार निधीतून केमेरे बसवण्याचे मान्य केले आहे. उपतालुका प्रमुख पद स्विकारल्या पासून शिवसेना पक्षात इनकमिंग वाढली आहे.त्यामुळे आगामी काळात शिवसेना पक्ष लोणावळा आणि परिसरात पक्षाची ताकद वाढणार आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page