अटल सेतूचे प्रथम प्रवासी,से.नि.कस्टम अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मदन लाला पवार राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित



मावळ मराठा न्युज – ईगल फौंडेशनच्या वतीने संजय घोडवत विद्यापीठ अतिग्रे, कोल्हापूर येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या विविध मान्यवरांचा राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवरील यशस्वी गुणवंतांचा त्यांच्या कार्याचे, योगदानाचे यथोचित मूल्यमापना नुसार विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अटल सेतूचे प्रथम प्रवासी,से.नि.कस्टम अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते श्री मदन लाला पवार यांना त्यांच्या तीस वर्षाच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून ईगल फाउंडेशन कडून देण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले. संजय घोडावत विद्यापीठामध्ये रविवार दि.८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे माजी खासदार निवेदिता माने,उद्योजक श्री एन.सी.संघवी,डॉ.शंकर अंदानी,श्री प्रविण काकडे,श्री सुर्यकांत तोडकर – विश्वस्त डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समुह, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, हातकणंगलेचे तहसिलदार सुशिल बेलेकर ईगल फौंडेशनचे प्रेसिडेंट श्री विलासराव कोळेकर यांच्यासह त्यांचे सहकारी , बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री.बी.जी.काका पाटील, वशीचे गावचे फौजी संजय जाधव, प्रतापराव पाटील, वाघवाडी ‘विरासत मिसळचे ‘ मालक दीपक वाघ, पेठ चे वर्गमित्र से.नि. नायब तहसीलदार श्री नारायण पेठकर , डॉ. मुसा जमादार, रघुनाथ पाटील, ताजुद्दीन जकाते, अंबरनाथ कांबळे, सी.आर. सांगलीकर फाऊंडेशनचे संचालक श्री अमोल कांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री जितेंद्र पवार, निवृत्त पोलीस अधिकारी आनंदा (बापू) पवार,सुभाष कांबळे इत्यादी उपस्थित होते. मदन पवार यांनी त्यांना मिळालेला राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २०२४ दानशूर उद्योगपती स्वर्गीय रतन टाटा यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित केला.




