तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित नर्सिंग स्कूलचा बालविसावा लॅम्प लाइटिंग,शपथविधी समारंभ संपन्न

मावळ मराठा न्यूज:- तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित नर्सिंग स्कूलचा बालविसावा लॅम्प लाइटिंग,शपथविधी समारंभ अत्यंत दिमाखात प्रसन्न वातावरणात संपन्न झाला! समारंभच्या अध्यक्षस्थानी होते संस्थेचे अध्यक्ष श्री गणेशजी खांडगे! प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनानंतर प्राचार्य मोनालिसा मॅडमने सर्वांच स्वागत आणि प्रास्ताविक केलं! आमच्या स्कूलचा प्रत्येक विद्यार्थी हा रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून निश्चितच कार्यरत राहील असं अध्यक्ष श्री गणेशजी खांडगेनी अभिवचन सर्व उपस्थित पालकांना आपल्या मनोगतात व्यक्त दिलं! नरसिंग क्षेत्रातील अनुभव संपन्न प्रमुखपाहुणे श्री दत्तात्रयजी करडिलेसरांनी रुग्णसेवा करीत असतानाच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास प्रयत्नपूर्वक जोपासावा अशी अपेक्षा व्यक्त केली! चेअरमन शैलेशभाई शहानी परिचारिकांनी रुग्णांशी संवाद साधताना त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवावा याच्या सुरेख टिप्स विद्यार्थ्यांना दिल्या ! आय एम एच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी करावी ही अपेक्षा शैलेश भाईंनी आपल्या मनोगतात व्यक्त केली! अप्पदिपो भव-_ तू स्वतः दीप हो याच भावनेने विधिवत प्रार्थना आणि शपथविधी संपल्यानंतर या सर्वांनी आपली मनोगत व्यक्त केलीत! नर्सिंग स्कूलचे पालकमंत्री डॉ शालिग्राम भंडारींनी आपल्या समारोपाच्या भाषणात विविध दृष्टांत काव्यपंक्ती आणि शेरोशायरी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह पालकांनाही प्रोत्साहित केले! विद्यार्थ्यांतर्फे प्रफुल्ल लोंढे- दिव्या केदारी आणि पालकांतर्फे पालकांतर्फे प्रवीण लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले! प्रतीक्षा बालगुडे आणि शुभांगी कदम यांनी उत्तम सूत्रसंचालन केले! क्रिस्टिना रणभिसे मॅडमने सर्वांचे आभार मानलेत! पसायदानाने समारंभाची सांगता झाली!

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page