कार्ला गावच्या सरपंच पदी सौ उज्वला अंकुश गायकवाड यांची बिनविरोध निवड

मावळ मराठा न्युज- कार्ला, कार्ला ग्रामपंचायत माजी सरपंच सौ भारती संतोष मोरे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे कार्ला ग्रामपंचायतिचे सरपंच पद रिक्त असल्यामुळे कार्ला ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची निवडणूक वार शुक्रवार दिनांक २१/११/२०२५ रोजी पार पडली. कार्ला ग्रामपंचायतिच्या सदस्य सौ दिपाली दीपक हुलावळे “सूचक” यांनी सरपंच पदासाठी चे उमेदवार सौ उज्वला अंकुश गायकवाड यांचे नामनिर्देशन पत्र अध्यायशी अधिकारी ए धायगुडे यांच्याकडे सादर केले.त्याची छाननी अंती वैध ठरवले त्या नंतर सरपंच पदासाठी एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने सौ उज्वला अंकुश गायकवाड ह्या सरपंच पदी बिनविरोध निवडून आल्याचे अध्यायशी अधिकारी यांनी जाहीर केले. या निवडून प्रक्रियेसाठी ए धायगुडे मॅडम यांनी अध्यायशी म्हणून काम पहिले व सचिव म्हणून ग्रामपंचायतिचे अधीकारी श्री एस आर सरपाते यांनी काम पहिले.त्यानंतर स्वागत समारंभ पार पडला. कार्यमाची सुरवात रविंद गायकवाड यांनी करून देताना आलेल्या सर्व मान्यवरांची ओळख करून देऊन आलेल्या सर्व ग्रामस्थ व पाहुण्यांचे स्वागत केले. उपस्थिता मध्ये रायगड तालुका जिल्हा परिषेदेचे माजी सदस्य ऍडव्होकेट राजेंद्र येरुणकर.तळेगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा रंजना ताई भोसले, कार्ला ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ भारती संतोष मोरे, कार्ला ग्रामपंचायतिच्या माजी सरपंच व पी एम आर डी च्या माजी सदस्या सौ दीपाली ताई दीपक हुलावळे, पुणे जिल्हा परीषेदेचे माजी सदस्य भाई भरत मोरे, एकविरा देवस्थान कार्ला ट्रस्टी चे अध्यक्ष व माजी पंचायत समिती वडगाव चे सदस्य दीपक शेट हुलावळे, कार्ला ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर जाधव, माजी उपसरपंच किरण शेट हुलावळे.कार्ला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस आर सरपाते अडव्होकेट बाळासाहेब घोलप. अशोक मानकर साहेब.अडव्होकेट रागिनी ताई भोसले.अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेचे कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी उपसरपंच किरण शेट हुलावळे यांनी केले. व अडव्होकेट येरुणकर यांनी शुभेच्छा दिल्या त्या नंतर कार्ला गावचे माजी उप सरपंच चंद्रकांत गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा दिल्या तसेच तळेगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा रंजना ताई भोसले यांनीही शुभेच्छा देऊन आलेल्या सरपंच पदाच्या संधीचे सोने करून गावचा विकास करण्या साठी कशा प्रकारे काम करावे या बद्दल माहिती दिली. त्याच प्रमाणे . एकविरा देवस्थान कार्ला ट्रस्टी चे अध्यक्ष व माजी पंचायत समिती वडगाव चे सदस्य दीपक शेट हुलावळे यांनी शुभेच्छा देऊन ग्रामपंचायती बद्दल माहिती देऊन गावातील विकास कामे कशा प्रकारे केली व कशी करायची याची माहिती दिले तसेच सर्व ग्रामस्थांमुळे आम्ही आहोत आणि जी ही काही पदे भेटतात ती यांच्यामुळेच भेटतात त्यांच्या मुळेच आम्ही आहोत त्याचा आशीर्वाद व प्रेम सदैव आमच्यावर आहे. म्हणून त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच जिल्हा परिषेद माजी सदस्य भाई भरत मोरे यांनी आलेल्या सर्व ग्रामस्थ, पाहुणे यांच्या वतीने शुभेच्छा देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. व कार्यक्रमाची समाप्ती केली. त्या नंतर भव्य मिरवणूक काढून वातावरण आनंददाई केले व राहत्या घरी गायकवाड कॉलनी कार्ला येथे कार्यक्रमाची सांगता केली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page