पोक्सो व बलात्काराच्या आरोप असलेल्या आरोपीची निर्दोष मुक्तता,आरोपीच्या वतीने अँड.पूजा बुटाला यांनी काम पाहिले







मावळ मराठा न्युज – वडगांव मावळ -आरोपी भगवान गणपत आढाव यांचेवर स्वतःच्या ३ वर्षे वयाच्या नातीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. हा आरोपी टाकवे बुद्रुक येथील राहणार होता. २०२३ मध्ये सदर आरोपीवर वडगाव मावळ पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३७६ व बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षक कायदा पोक्सो कायदा कलम ४,५,६,७,८,९ अन्वये गुन्हा दाखल होता. सन २०२३ पासून सदर आरोपी येरवडा कारागृह येथे शिक्षा भोगत आहे.सदर आरोपीचे वकिल म्हणून लोणावळ्याच्या अँड.पूजा बुटाला यांनी काम पाहिले. आरोपीवर खटला हा वडगाव मावळ येथील जिल्हा न्यायाधिश उदडार साहेब यांचे समोर गुणावगुणांवर चालवला व यशस्वीरीत्या युक्तीवाद करून आशिलावर असलेले बलात्कारासारखे गंभीर गुन्हे खोटे असल्याचे सिदध केले.त्यामुळे दिनांक. २९ .११.२०२५ रोजी वडगाव मावळ जिल्हा न्यायालयाने आरोपीस निर्दोष घोषित केले.



