इन्कलाब झिंदाबाद,मी नास्तिक का आहे ?या शहिद भगतसिंग यांच्या लेखातील छोटा भाग

मावळ मराठा न्युज नेटवर्क -प्रगती घडवायला सज्ज ठाकलेल्या माणसाला जुन्या श्रद्धेतील प्रत्येक बाबीबद्दल टीका करावी लागते, अविश्वास दाखवावा लागतो व तिला आव्हान द्यावे लागते. प्रचलित श्रद्धेचा हरेक कानाकोपरा धुंडाळून त्याला प्रत्येक लहानसहान बाबीची तर्कनिष्ठ चिकित्सा करावी लागते. अशा ब~याच विचारांती जर त्याला एखासा सिद्धान्तावर किंवा तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवणे योग्य वाटले, तर त्याच्या विश्वासाचे आपण स्वागत करू. त्याची विचार पद्धती चूक असू शकते, चुकीच्या मार्गाने गेलेली असू शकते किंवा खोटी व फसवी असू शकते. पण त्याच्या विचारांमध्ये सुधारणा होऊन तो योग्य मार्गावर येऊ शकतो, कारण तर्क हा त्याच्या जीवनाचा दिशादर्शक ध्रुवतारा असतो. पण पोकळ श्रद्धा किंवा अंधश्रद्धा धोकादायक आहे. ती मेंदू शिथिल करते आणि माणसाला प्रतिगामी बनवते.-क्रांतीकारक शहिद भगतसिंह

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page