कांदा,टोमॅटो,फळ,भाज्या व दुधाच्या दराबाबत राज्य सरकारने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा -विठ्ठल पवार राजे



मावळ मराठा न्यूज:-प्रतिनिधी,दिनांक २८ मे २०२३ राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व समस्यांविषयी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव माननीय श्री मनोज सौनिक साहेब यांच्या समावेत आज मंत्रालय मुंबई येथे शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना संपूर्ण भारत महाराष्ट्र राज्य ची बैठक झाली. त्यावेळी कांदा टोमॅटो शेती फळभाज्या व पालेभाज्या तसेच गाईचे दुधाला चाळीस रुपये लिटर बेस रेट एमआरपी ची मागणी करण्यात आली. मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत संघटनेने गाईचे ४० /- रुपये तर म्हशीचे दुधाला साठ रुपये प्रति लिटर दुधाचे बेस रेट विक्री दर मिळवा बाबत विनंती केली. तसेच उत्पादक शेतकऱ्यांना शेपू मेथी कोथिंबीर इत्यादी भाजीपाला किमान १०/ – दहा रूपये बेस रेट, तसेच फळभाज्या, टोमॅटो, कांद्याचे दर किमान १८ .५० रूपये बेस रेट विक्री किंमत बाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पणन मंत्री सहकार व कृषी मंत्री यांचे उपस्थित राज्यस्तरीय विशेष बैठक बोलवावी अशी विनंती राज्यातील तमाम शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या वतीने संघटनेने केली आहे. तसेच मागील चार ते पाच वर्षांमध्ये साखर आयुक्तालयातील हजारो कोट्यावधी रुपयाच्या FRP, RSF व, H&T व्यवहारात प्रचंड आर्थिक गैर व्यवहार घोटाळा, साखर कारखाने विना परवाना गाळप हंगाम घेतल्याने त्यांच्यावर चालु हंगामात अत्यंत उशीरा झलेली १७७ .८० कोटींची दंडात्मक कारवाई केली केवळ.? तर मागील चार वर्षातील ३३३ कोटी रुपयांची दंडात्मक कारवाईची वसूल करण्याबाबत साखर आयुक्तांकडून दिरंगाई करण्यात आलेली आहे. तसेच गेल्या तीन ४ वर्षातील साखरेची सतत खालवणारी रिकव्हारी घोटाळ्यासंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निलंबित करून सकत्तवसुली संचालनालयामार्फत चौकशीचे आदेश द्या बाबत माननीय चीफ सेक्रेटरी श्री मनोज सौनिक साहेब यांना संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक यानी सवित्सर तीन लेखी निवेदन देऊन चर्चा केली.यावेळी आज दिनांक २८ मे पुणे येथे पत्रकारांची बोलताना राजे म्हणाले की उत्पादक शेतकऱ्यांचा कोणताही शेतमाल बाजार समित्या अथवा बांधावर खरेदी करताना हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या संबंधित अडते व्यापारी दलाल यावरती दलालांवरती तात्काळ जागेवरती ऑन दी स्पॉट त्यांचे लायसन जप्त करून त्यांच्यावर देशद्रोहाचा कडक गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत व राज्य सरकारने शेतकऱ्यांचा शेतमाल देस रेट विक्री किंमत एमआरपी निर्णयाप्रमाणे घेण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री तथापन मंत्री गृहमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे. यावेळी संघटनेचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर राज्याचे टेक्निकल विभागाचे प्रमुख संजय वाडे संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार व डायरेक्टर निवृत्ती भराटे हे उपस्थित होते.




