प्रा.रामकृष्ण मोरे, लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय,खंडाळा वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज:-खंडाळा, प्रा. रामकृष्ण मोरे, लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय, खंडाळा येथील सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक २७/१२/२०२३ ते २९/१२/२०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचाबक्षीस वितरण व विविध गुणदर्शन सोहळा शुक्रवार दि. २९/१२/२०२३ रोजी खंडाळा लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांच्याप्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष लो. न.प.व माजी नगसेविका लो.न.प.श्री. प्रमोद रामचंद्र गायकवाड मा.सौ. पुजा प्रमोद गायकवाड, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी,श्रीराम कुमठेकर,मंगेश खराडे,उप मुख्याधिकारी शरद कुलकर्णी,मंगेश येवले,सुरेश गायकवाड,माजी नगरसेविका सुनीता लांगे,माजी मुख्याध्यपिका तारामती शिर्के,शेख सर आदी मान्यावर उपस्थित होते यावेळी अशोक साबळे यांनी विद्यार्थी,पालक आणि शिक्षक वर्ग यांना मार्गदर्शन केले.शाळेच्या मूलभूत सुविधा पेक्षा शिक्षणाचा दर्जा चांगला असेल तर कोणतीही अडचण येत नाही.विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल वरील वेळ कमी करून जास्तीत जास्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल,जगात मोठी स्पर्धा असून त्यासाठी आपले आपल्या ध्येयासाठी आताच कष्ट घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. सदर शाळेचे पालकत्व हे नगर पालिकेचे असून त्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेल अशी ग्वाही साबळे यांनी यावेळी दिली.सदर प्रसंगी सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, माजी सभापती व सदस्य शिक्षण मंडळ लोणावळा, आजी-माजी पालक संघ सदस्य, माजी विद्यार्थी संघ, लो.न.प. अधिकारी व कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ आणि सर्व बक्षिसदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहसंमेलन प्रमुख व किडा प्रमुख श्री. बोरसे डी. आर. यांनी सूत्रसंचलन केले.यावेळी व्यवसाय शिक्षण विभाग प्रमुख (ऑटो.)चे चव्हाण प्रमोद,कु. जयवंत बाळू देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी श्री. सुर्यवंशी आर. पी. स्नेह संमेलन उपप्रमुख कु. पाथरे अमृता,कु.अंजली गोविंद शिंदेविद्यार्थीनी प्रतिनिधी,व्यवसाय शिक्षण विभाग प्रमुख (रिटेल)श्री. गायकवाड गौतम शिक्षकेतर प्रतिनिधीसौ. भाले एस. एस. शिक्षक प्रतिनिधी व सांस्कृतिक विभान प्रमुख,श्री. कविता संतीष ढाकोळ उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिवेकर राजेंद्र जगन्नाथ यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. बक्षीस वितरण नंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page