लोणावळा नगरपरिषदचें नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न








मावळ मराठा न्युज – लोणावळा,आज दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळा नगरपरिषद चें नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांचा पदग्रहण सोहळा मावळ चें कार्यसम्राट आमदार सुनील शेळके,मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष खांडगे,एकविरा देवस्थान ट्रस्ट चें अध्यक्ष दिपक हुलावळे,शरद पवार राष्ट्रवादी शहर अध्यक्ष नासिरभाई शेख,नारायण पाळेकर मुख्याधिकारि अशोक साबळे, विठ्ठल शिंदे,यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला.यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका यांचा शाल पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वच शहर प्रमुख,भाजप चें नगरसेवक देवीदास कडू यांनी आता खऱ्या अर्थाने लोणावळा नगपरिषद मावळाचे आमदार सुनील शेळके यांनी स्वच्छ केली असे सुरेखा जाधव यांचे नाव न घेता टोला लगावला तर भाजप चें दत्तात्रय येवले यांनी नगरपरिषद कायदा चें पुस्तक नगराध्यक्ष यांना भेट देऊन आमचे नेहमीच लोणावळा शहराच्या विकासासाठी सहकार्य राहिल असे सांगितले. यावेळी सर्वच पक्षांनी आमदारसुनील शेळके यांचे आभार मानले. तर नगराध्यक्ष यांनी स्वच्छ कारभाराची माझी ग्वाही देत बाकी तुम्ही बघा असं म्हणत आमदारवर सोडले. यावेळी साध्या सरळ शैलीत नवनिर्वाचित नगराधक्ष राजेंद्र सोनावणे यांचे लोणावळा नगरपरिषद पदग्रहण सोहळ्यातील सभागृहातील पहिल्या भाषणाने संपूर्ण सभागृह खद खधून हसले. आमदार सुनील शेळके यांनी सर्वच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका यांना मतदार यांनी तुम्हाला निवडून दिले आहे त्यांच्याशी नेहमीच संपर्कात राहा आणि कामे करत राहा नाहीतर मी परत चौकात जाऊन सांगेल नाकर्ता नगरसेवक म्हणून असेही सुनील शेळके यांनी कानमंत्र दिला. विकासाचीकामे करण्यासाठी तुम्ही कधी पण या मी तुमच्यासोबत आहे आणि १०० कोटी निधी मी आणून देईल अशी ग्वाही दिली. तर भाजप च्या मावळातील नेत्यांपेक्षा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लाडका आहे हे सांगताना आमदार सुनील शेळके यांनी माझा नेता अजित दादा आहेत हे सांगायला ते विसरले नाहीत. मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सर्व नगरसेवक नगराध्यक्ष आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले.तर जितेंद्र राऊत यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



