शिक्षक दिनाचे औचित्य साधून औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड येथे प्रशिक्षणार्थींचे स्वागत व प्राचार्यांचे अभिभाषण


मावळ मराठा न्यूज़ ,पिम्परी चिंचवड़ :- शिक्षक दिनाचे औचित्य साधून औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड येथे प्रशिक्षणार्थींचे स्वागत व प्राचार्यांचे अभिभाषण कार्यक्रम संपन्न झाला ,याप्रसंगी बोलताना प्राचार्य श्री शशिकांत साबळे यांनी कौशल्य विकास ही यशस्वी करियरची गुरुकिल्ली आहे व ती प्राप्त केल्यास आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येते असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमात संस्थेचे गटनिदेशक श्री मोरे ए.एस, श्री पावडे एस.बी,प्रभारी गटनिदेशक श्री माळी पी.टी ,तसेच संस्थेचे सर्व निदेशकीय कर्मचारी, ऑफीस कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते.तसेच नव्याने प्रवेशित प्रशिक्षणार्थीं व त्यांचे पालक हजर होते.काॅलेज बद्दलची सविस्तर माहिती श्रीमती पांचाळ, श्रीमती भोपळे यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पी.डी.पाटील, श्री ऐवळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष गुरव यांनी केले.




