लायन्स क्लब लोणावळा खंडाळा यांनी बांधकाम क्षेत्रातील मजूर व मुक्या जनावरांना दिली मायेची उब,ब्लॅंकेट वितरण




लायन्स क्लब लोणावळा, खंडाळा चे सचिव श्री. विरल गाला यांचे वाढदिवसाचे औचित्य साधत बांधकाम साईट वरील मजूर व प्राणि मात्रांकरिता केले सुमारे ४० ब्लँकेट्स चे वाटप, थंडीची चाहूल लागल्याने बांधकाम साईट वरील बांधकाम मजूर, लहान मुले, पत्राच्या शेड मध्ये राहतात त्यामुळे त्याना ब्लँकेट्स तसेच दिल्ली येथील प्राणी मात्रा संघटना मुक्या व आजारी व जखमी जनावरां करिता ब्लँकेट्स आवश्यकता असल्याचे कळले वरून त्याना कुरिअर दवारे ब्लँकेट्स पाठविण्यात आले बाबतची माहिती लायन्स क्लब लोणावळा,खंडाळाचे अध्यक्ष अँड प्रफुल लुंकड यांनी दिली. तसेच त्याचे वितरण,सेक्रेटरी ला.विरल गाला, ला. देवल पारेख, ला. चार्मी पारेख संस्थेचे मान्यवर उपस्तिथ होते.




