लोणावळा शहर उपजीविका कृती आराखडा कार्यबल समिती ची बैठक संपन्न

मावळ मराठा न्युज-लोणावळा,दिनांक ३ एप्रिल, २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या वेळात लोणावळा मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांचे अध्यक्षते खाली स्थायी समिती सभागृह,नगरपरिषद तिसरा मजला येथे लोणावळा शहर उपजीविका कृती आराखडा कार्यबल समिती ची बैठक संपन्न झाली. CLTF बैठकीस मुख्याधिकारी श्री अशोक साबळे,उप मुख्याधिकारी श्री शरद कुलकर्णी, शहरातील हॉटेल संघटना, वाहतूक संघटना, कामगार संघटना,ज्येष्ठ नागरिक संघटना ,फेरीवाले संघटना,आदी संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक आणि C-LAP विषयक मूलभूत माहिती शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी दिली. मा.मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांनी शहराच्या होणाऱ्या कृती आराखड्या साठी सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या शहरासाठी पर्यटन अभिमुख रोजगाराच्या संधी असल्याने त्या दृष्टीने आराखडा पुढे जावा आणि शहराच्या विकास विषयक सर्व घटकांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे सांगितले.मुख्याधिकारी यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. तथा शासकीय विभाग आणि संस्था संघटना प्रतिनिधी यांनी मते मांडली व सविस्तर चर्चाही झाली. सर्वांना उपजीविका कृती आराखडा विषयक मार्गदर्शक सूचना spiral binding booklet वाटप करण्यात आले. येत्या दहा दिवसामध्ये सर्वांनी उपजीविका कृती आराखडा याबाबत आपले मत,माहिती सल्ला व अपेक्षा लिखित स्वरूपात देण्यात याव्यात असे ठरले. पुढील बैठक १५ एप्रिल,२०२५ रोजी होणार असल्याचे ठरविण्यात आले.आभार दिलीप गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.बैठक आयोजनात शहर उपजीविका केंद्राच्या व्यवस्थापक संगीता पवार,लेखापाल सीमा पवार,डाटा एन्ट्री ऑपरेटर संगीता वीरभद्रे आणि पूजा राठोड यांनी मदत केली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page