लोणावळा येथे रिक्षा चालक मालकांचा मेळावा हिट अँड रन बाबत चालक-मालकांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करावी- बाबा कांबळे

मावळ मराठा न्युज:-लोणावळा, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्यांना म्हातारपणी पेन्शन मिळाली पाहिजे , मुक्त रिक्षा परवाना बंद झाला हिजे, इ चलन बंद झालं पाहिजे, याबरोबर देशभरामध्ये सध्या सुरू असलेल्या हिट अँड रन प्रकरणी सरकारने रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या चालक-मालकांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करावी, चालक-मालकांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा केल्याशिवाय, व आमचे प्रश्न सोडवल्याशिवाय माघार घेणार नाही, महाराष्ट्र सह देशभरामध्ये स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू झाले असून देशातील चालक-मालक हे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, आंदोलन करणाऱ्या संघटना प्रतिनिधी सोबत चर्चा करण्याऐवजी सरकार मात्र उद्योगपती आणि भांडवलदार ट्रान्सपोर्टस सोबत चर्चा करत आहेत, यामुळे देशभरातील 25 करोड चालक मालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली यामुळे पुन्हा 9 जानेवारीपासून स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू करण्यात आले असून सरकारने चालक-मालकांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करावी असे आवाहन बाबा कांबळे यांनी सरकारला केले आहे,लोणावळा येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने रिक्षा चालक मालकांचा मेळावा मोठ्या उत्साहांमध्ये संपन्न झाला यावेळी बाबा कांबळे बोलत होते,*यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रदीप शिंगारे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबुभाई शेख, प्रदेश संघटक हाजी अब्बास खान,अध्यक्ष आनंद सदावर्ते, गुजरात येथील वाहतूक अघाडीचे सतीश जागडा आदी उपस्थित होत.आरटीओ अधिकारी मा.प्रदीप शिंगारे साहेब यांनी सर्व उपस्थितांना रस्ता सुरक्षा व इंशुरन्स विषयाचे सविस्तर चर्चा करून उपयुक्त मार्गदर्शन केले.स्नेहमेळाव्यात उपस्थित रिक्षा चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता,एन वेळी लोणावळा शहर कार्यकारिणी च्या वतीने लकी ड्रॉ काढून,पाच विजेतांना रिक्षाचे MRF टायर चे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान घनवट,सुत्रसंचालन विकास खेंगरे व आभार बाबूभाई शेख यांनी मानले.कार्यक्रमाच्या संयोजनासाठी आनंद सदवर्ते , विनय बच्चे, भगवान घनवट, प्रविण गायकवाड,विकास खेंगरे, भाऊ शिवेकर,रविंद्र ताकदूंदे,चंद्रकांत बालगूडे,वासिम खान,संजय डेंगळे, सत्तारभाई शेख यांनी परिश्रम घेतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page