लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज कडून गरजू आणि निराधार कुटुंबाना २० किराणा किट चे मोफत वाटप




मावळ मराठा न्यूज- लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज,टीम सन्माननीय देणगीदारांच्या पाठिंब्याने दिनांक ४ मार्च २०२६ रोजी गरीब कुटुंबे आणि विधवांना एक महिना पुरतील अशा २० रेशन किट्सचे वाटप करण्यात आले . ५ जणांच्या कुटुंबासाठी रेशन किट्स व्यतिरिक्त रूह अफजा, सेवईया, शीर खुर्मासाठी सुके फळे आणि दूध देखील वाटप करण्यात आले.यासाठी उदार आणि देणगीदारांचे मोठे सहकार्य लाभत असते. हे वाटप क्लब अध्यक्ष पीएमजेएफ लायन सुरैया वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी लोणावळा सुप्रीमोजचे आणि लोणावळा संघाचे सुप्रीम यांनी रेशन किट्सचे वाटप केले. गरीब आणि दलितांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असते लायन्स क्लब ओफ लोणावळा सुप्रिमोज.



