गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने श्रद्धांजली शोक सभाचे आयोजन




मावळ मराठा न्युज:- पिंपरी,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण निरीक्षक कै संजय सुर्वे व गुणवंत कामगार ज्येष्ठ साहित्यिक कामगार कवी कै ऊद्धव कानडे यांच्या दुःखद निधना निमित्त गुणवंत कामगार कल्याण मंडळ यांचे वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली या प्रसंगी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा डाँ भारती चव्हाण यांनी यांनी संजय सुर्वे व कवी उद्धव कानडे यांच्या आठवणींना उजाळा दिला कुटुंबीय सर्व सभागृहातील शोकाकुल भावनिक झाले होते. प्रत्येकजन संजय सुर्वेच्या आठवणींना उजाळा देऊन आपल्या भावना व्यक्त करत होते सुर्वे यांनी कामगाराप्रती असणाऱ्या योजना पोहोचल्या होत्या व प्रत्येक कामगार कल्याण मंडळातील सदस्य आपल्या कुटुंबातील सदस्य आहे अशी त्यांना वागणूक देत होते प्रत्येक कामगाराची ते आपुलकीने व चौकशी करत असल्याचे भारती चव्हाण यांनी सांगितले,यावेळी अध्यक्षा भारती चव्हाण,नगरसेवक कामगार नेते मा उपमहापौर श्री केशव घोळवे, कामगार कल्याण केंद्र अधिकारी श्री अनिल कारळे,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक श्री अनिल घोगरे,बाष्पके बाँयलर विभागाचे सहसंचालक श्री सी.जी. पवार ,बांधकाम कामगार महामंडाळाचे श्री महेंद्र वाघमारे थरमँक्स कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री किशोर सोमवंशी,टाटा मोटर्स कामगार प्रतिनिधी श्री विलास सकपाळ,टाटा मोटर्स पतपेढीचे सेक्रेटरी श्री राजेंद्र येळवंडे,कै यशवंतराव चव्हाण स्मारक समिती चे श्री गोपीचंद जगताप ,शिवशंभो फौंडेशन चे सहसचिव श्री राजेंद्र पवार,टाटा मोटर्स समाज विकास केंद्र सचिव श्री शिवाजीराव पाटील,पिंपरी चिंचवड साहित्य संघाचे श्री तानाजीराव एकोंडे ,टाटा मोटर्स कलासागर साहित्य विभागाचे सदस्य श्री भरत बारी, संभाजीनगर केंद्रातील शिवणक्लास वर्गातर्फे सौ रुपाली मुळीकताई,योगा वर्गा तर्फे श्री रविंद्र बटाटे ,व्यसनमुक्ती वर्गातर्फे श्री चंद्रमोहन गुप्ता सह विविध संस्था व आस्थापनातील कर्मचारी , गुणवंत कामगार,अधिकारी ,केंद्र सभासद ,कामगार कुटुंबिय,कामगार नेते उपस्थित होते पसायदानाने या सभेची सांगता करण्यात आली गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे सचिव राजेश हजारे यांनी या सभेचे सुत्रसंचालन प्रास्ताविक केले. या सभेसाठी गुणवंत कामगार कल्याण मंडळ राज्यस्तरीय कोअरचे सदस्य भरत शिंदे, आण्णा जोगदंड, तानाजी एकोंडे, गोरखनाथ वाघमारे, शहराध्यक्ष महमंदशरीफ मुलानी यांनी नियोजन केले होते.




