विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाने भोंडे हायस्कूलचे स्नेहसंमेलन संपन्न

मावळ मराठा न्यूज,लोणावळा येथील ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. गुरुवार दि. २२ डिसेंबर व शुक्रवार दि. २३ डिसेंबर असे सलग दोन दिवस प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाने आलेल्या पाहुण्यांची व पालकांची मने जिंकली. कोरोना काळानंतर तीन वर्षांनी असे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. दोन्ही दिवस आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन, सरस्वती व नटराजाचे पुजन करण्यात आले. पहिल्या दिवशी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख तर दुसर्‍या दिवशी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अमोल साळवे यांनी पाहुण्यांचे स्वागत करत प्रास्ताविक मांडले तर विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव राधिका भोंडे यांनी शाळेचा मागील वर्षाचा आढावा स्क्रीन च्या माध्यमातून आलेल्या पाहुण्यांना व पालकांना सांगितला. विद्य‍ार्थ्यांनी प्रेरणा घेऊन यश संपादन करावे यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी ओंकार कुलकर्णी ( बी टेक इंजिनिअर) व डाॅ. अनिकेत बिस्वास यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते.या स्नेहसंमेलनाला यशस्वी होण्यासाठी कला शिक्षक नितीन तिकोणे, कुमुदिनी बिरूड, जान्हवी रसाळ व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव भोंडे ,विश्वस्त अरूण मोरे ,काचरे काका, माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, संजय वीर, अर्जुन पाठारे, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी ,पत्रकार प्रशांत पुराणिक, बंडू येवले, संजय गायकवाड, उद्योजक राजेश मेहता, शाळेच्या माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका तृप्ति गव्हले, प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका स्मित‍ा इंगळे, पर्यवेक्षिका माधवी थत्ते यांसह पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .चौकट सौ. रोहिणी सोले सौ. दिपा गुप्ता व सौ. सोफिया साळवे यांना मिळाला आदर्श शिक्षक पुरस्कारयावेळी शाळेतील वर्ष भर केलेल्या कार्याची दखल घेत संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो यासाठी पूर्व प्राथमिक विभागातून शिक्षिका दिपा गुप्ता प्राथमिक विभागातून रोहीणी सोले तर माध्यमिक विभागातून सोफिया साळवे यांची निवड करण्यात आली तर शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये निवडकरण्यात आली

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page