शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संलग्न शिवशाही व्यापारी संघांची शिवसेना भवन दादर येथे बैठक संपन्न

मावळ मराठा न्युज :-मुंबई- प्रतिनिधी, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष संघटना अधिक मजबूत करून आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. त्यांचा विश्वास संपादन करा आशा सुचना खासदार अरविंद भाई सावंत यांनी केल्या. यावेळी शिवशाही व्यापारी संघाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसेना नेते तथा खासदार अरविंद भाई सावंत, शिवसेना उपनेते तथा अंगीकृत संघटना समन्वय भाऊ कोरेगावकर, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/ अध्यक्ष युवराज दाखले, मुंबई प्रदेश अध्यक्ष योगेशजी घोरपडे, खोपोली शहर कार्याध्यक्ष तौफिक करजीकर, उद्योजक रोहीदास जाधव,शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी कोकण प्रदेश अध्यक्ष संगम जाधव , चेंबुर विधानसभा कार्याध्यक्ष रामचंद्र जाधव, माजी सरपंच अनिल म्हामुनकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page