अध्यात्मातून व्यक्तिमत्व विकास राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरातून अनुभवता येतो- नंदकुमार वाळंज

मावळ मराठा न्युज:-लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. पुरंदरे कला. श्रीमती एस. जी. गुप्ता. व श्रीमती. एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय लोनावळा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय विशेष हिवाळी शिबीर मौजे गाव आंबवणे येथे आयोजित करण्यात आले असुन या शिबिराचे उद्धाटन कोराईगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उदयोजक नंदकुमार वाळंज यांच्या हस्ते झाले . उद्घाटनाच्या वेळी मार्गदर्शन करताना भारतीय संस्कृतीचा अभिमान युवा पिढीने जोपासला पाहिजे .आधुनिक काळात सुद्धा आपण आपले आद्यात्म जोपासले पाहिजे . व आपला विकास साधला पाहिजे असा स्वंयसेवकांना संदेश अध्यक्षांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केला . या वेळी लोनावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव अँड. निलीमा खिरे मॅडम स्वंयसेवकांना उद्देशून दूरदर्शन वरील दाखविलेल्या ग्रामीण भागातील मालिकेतील घटना, या प्रत्यक्ष खेडेगावात जाऊन अनुभवता येतात. ते शिबिरातून साध्य होते व अनेक गोष्टी जवळून अनुभवता येतात. असे आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केले.या. वेळी शिबिराचे प्रास्ताविक करत असताना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व डॉ. पवन शिनगारे जिल्हा समन्वयक यांनी विषद केले . तसेच स्वयंसेवक शिबिरात राहून जे शिकणार आहेत ते पुढील काळात कसे फायदेशीर असते या विषयी माहिती दिली . स्वंयसेवकांना शिस्त व ग्रामीण भागातील जीवणमान समजुन घेण्याचे आव्हाण केले. या कार्यक्रमाच्या वेळी लोनावळा एज्युकेशन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याचा सत्कार प्रभारी प्राचार्य डॉ. विलास पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमाच्या वेळी लो. ए. ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय पाळेकर , मा. अँड अजय भोईर सहसचिव , मा. सौ .शैलजा फासे विश्वस्त, मा. विशाल पाडाळे सी.डी.सी मेंबर्स, आणि मा.श्री. डॉ. दिगंबर दरेकर (सी.डी.सी मेंबर) उपसरपंच श्री . सुनिल हुंडारे ग्रामसेवक श्री. राजेंद्र शिंदे , माजी नगरसेवक दिलीप दामोदर , जयेशसेठ उद्योजक मुंबई सौ. अक्षरा दळवी, निलेश मेंगडे ग्रा. सदस्य आंबवणे , सोनू अनाजी वाळंज विदयालयाचे मुख्याध्यापक बी जी. देवरे , शिक्षक, कर्मचारी व महाविदयालयाचे शिक्षकवृंद व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. स्वंयसेवक प्रतिनिधी जयवंत दळवी याने केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी श्री. धनराज पाटील यांनी केले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page