“बुवा बाजी,अंधश्रद्धा,अनिष्ट प्रथा यांचा फटका सर्वसामान्य,दीनदुबळ्याना- प्रा.राजेंद्र कांकरिया



मावळ मराठा न्युज :-चिंचवड-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) शब्दधन काव्यमंच चा “चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी “हा स्तुत्य उपक्रम पिंपरी चिंचवड परिसरात राबविला जातो. श्री. सुरेश कंक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम होतो. यंदा अंनिस च्या पिंपरी चिंचवड शाखेचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर गटाचे अध्यक्ष, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य, साहित्यिक डॉ. राजेंद्र कांकरिया आणि त्यांच्या सुविद्य पत्नी साहित्यिका सौ. छाया कांकरिया या उभयतांचा यथोचित सन्मान त्यांच्या शांतीबन सोसायटीच्या निवासस्थानी ज्येष्ठ पत्रकार संपादक मा. शिवाजीराव शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना प्रा. कांकरिया यांनी मनोगत व्यक्त केले. शब्दधन चे अध्यक्ष श्री.सुरेश कंक,कार्यकारिणी सदस्य, सभासद श्री. नंदकुमार मुरडे, श्रीकांत चौगुले, पुरुषोत्तम सदाफुले, शोभाताई जोशी, आय के शेख, फुलवती जगताप, सविता इंगळे, सुभाष चव्हाण, तानाजी एकोंडे, आनंदराव मुळूक, अशोक कोठारी, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे, बबन तरस, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर, सुप्रिया लिमये, राधाबाई वाघमारे, कैलास भैरट, प्रा. तुकाराम पाटील, सुभाष चटणे, बाबू डिसोजा, माधुरी डिसोजा, मधुश्री ओव्हाळ, संगीता सलवाजी, अशोक महाराज गोरे, आण्णा गुरव आदि सदस्य या प्रसंगी उपस्थित होते. पत्रकार मा. प्रदीप गांधलीकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. युवंश जैन, परिशा जैन, भावेश जैन, क्षितिजा जैन, चैतन्य बरसावडे, प्रीतीजा बरसावडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.




