लोणावळा महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. नरेंद्र वसंतराव देशमुख

मावळ मराठा न्यूज:-लोणावळा,मावळ तालुक्यातील नामांकित लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचालित डॉ. बी. एन. पुरंदरे कला, एस. जी गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती. एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय लोणावळा येथे डॉ. नरेंद्र वसंतराव देशमुख यांची निवड झाली. डॉ. नरेंद्र वसंतराव देशमुख यांनी दिनांक २४ -०१ -२०२४ पासून लोणावळा महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला आहे. डॉ. नरेंद्र वसंतराव देशमुख यांना २७ वर्षे शिक्षण क्षेत्राचा अनुभव असून ते मानसशास्त्र विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अनेक समित्यांवर कामकाज केले असून मागील ५ वर्षे त्यांनी मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. डॉ. नरेंद्र वसंतराव देशमुख यांचे लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांस शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाचा जगन्नाथ रथ सर्वांच्या सहकार्याने व मानवतावादी दृष्टीकोन ठेवून पुढे घेऊन जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page