मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित वराळे,तालुका मावळ येथील श्री भैरवनाथ विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ” संपन्न


मावळ मराठा न्यूज,तळेगांव -मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित श्री भैरवनाथ विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ”ढोल लेझीम आणि भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार अतिशय आकर्षक वेशभूषा परिधान केलेल्या उत्साही विद्यार्थिनींनी मान्यवरांच औक्षण करून स्वागत केलं! रांगोळी प्रदर्शन उद्घघाटन प्रमुख पाहुणे” ज्येष्ठ साहित्यिक- वक्ते डॉक्टर शाळीग्राम भंडारी” यांच्या हस्ते- तसेच विज्ञान प्रदर्शनाचे उद्घ घाटन एज्युकेशन कौन्सिलर श्री सतीश पाटीलयांच्या हस्ते आणि हस्तलिखित विमोचन संस्थेचे सचिव श्री यादवेंद्रजी खळदे यांच्या शुभहस्ते झाले! सहसचिव प्राध्यापक वसंत पवार यांनी समारंभाच प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय अतिशय समर्पक आणि मोजक्या शब्दात करून दिला! शिस्तप्रिय आणि अनुभव संपन्न मुख्याध्यापिका ललिता कांबळे मॅडम यांनी आपल्या अहवाल वाचनातून विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या आणि संस्थेच्या प्रगतीचा आलेखच उपस्थितांसमोर सादर केला! विद्यार्थ्यांशी संवाद साधताना-डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी विद्यार्थ्यांनी आपल व्यक्तिमत्व विकसित कस कराव या विषयावर प्रामुख्याने भर दिला! आपल्या बौद्धिक आणि उपलब्ध असलेल्या आर्थिक क्षमतेची जाणीव ठेवूनच आपलं भविष्य उज्वल घडविण्यास प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नशील असावं असं आपल्या मनोगतात व्यक्त केलं! हे स्पष्ट करताना त्यांनी स्वतःची अनेक उदाहरणं विद्यार्थ्यांसमोर सादर केलीत! सतीश पाटील सरांनी वेळेचं नियोजन आणि अभ्यासाची उत्तम पद्धत या संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला! अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव यादवेंद्रजी खळदे सरांनी रांगोळी विज्ञान आणि हस्तलिखितात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचेही मनापासून कौतुक केलं!त्याबरोबरच वक्तशीरपणा- एकाग्रता आणि शिस्तबद्धता अंगीकारल्याशिवाय आपल्याला आयुष्यात कुठलेही यश प्राप्त होणार नाही- याची जाणीव विद्यार्थ्यांना अतिशय समर्पक शब्दात करून दिली! विविध क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचं पारितोषिक देऊन सर्व मान्यवरांनी त्यांचं मनापासून कौतुक केलं!विद्यालयाच्या या संपूर्ण समारंभात वराळेगावच्या कार्यक्षम सरपंच सौ मनीषाताई शिंदे विद्यार्थ्यांच कौतुक करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत्या! अत्यंत अभ्यासू शिक्षिका सौ रोहिणी जंजिरे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्यामुळे समारंभाची उंची वाढतच गेली! सांस्कृतिक व रांगोळी विभाग सौ वर्षाराणी दगडे यांनी सांभाळला! विज्ञान आणि बक्षीस वितरण हा विभाग सौ स्नेहा दहीतुले यांनी सक्षमपणे हाताळला! हा अत्यंत शिस्तबद्ध आखीव रेखीव समारंभ यशस्वी करणाऱ्या सर्वांचे अतिशय समर्पक शब्दात श्री बी एच गाढवे सरांनी आभार मानले! दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करून उत्कृष्ट सह भोजनाने स्नेहसंमेलनाची सांगता झाली!




