श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात पालक,शिक्षक संघाची स्थापना,श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिराच्या पालक संघाच्या उपाध्यक्षपदी डॉ.विवेक चव्हाण

मावळ मराठा न्युज :-आळंदी,(अर्जुन मेदनकर) : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर, आळंदी या प्रशालेच्या इयत्ता पहिली ते चौथी वर्गांची शासकीय नियमा नुसार पालक सभा आयोजित करण्यात आली होती. पालक सभेत अभ्यासक्रम, शालेय कामकाज, सहशाले उपक्रम, विविध समित्या, आणि त्यांची कार्य इत्यादी बद्दल माहिती देण्यात आली. प्रत्येक वर्गाच्या पालकां मधून प्रतिनिधींची निवड करण्यात आली. पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक प्रदीप काळे यांच्या अध्यक्षते खाली नवीन कार्यकारणीची सभा झाली. निवडलेल्या प्रतिनिधी मधून संघाच्या उपाध्यक्ष पदी डॉ. विवेक चव्हाण यांची तर प्रशालेच्या शिक्षिका प्रतिभा भालेराव यांची सचिव म्हणून व कामिनी मुंडे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, ज्येष्ठ विश्वस्त एल.जी घुंडरे यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले .अजित वडगांवकर यांनी आता पर्यंत पालक संघाने संस्था शाळेच्या विकास कार्यात वेळो वेळी मदत सहकार्य केले आहे, इथून पुढेही सहकार्य मदतीची अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. डॉ. दीपक पाटील यांनी पालक संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page