आरोग्य आणि रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद,उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे यांचे कार्य कौतुकास्पद-खासदार श्रीरंग बारणे

मावळ मराठा न्युज – लोणावळा,शिवसेना भागरवाडी विभाग व यश हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे याच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिराचे उद‌घाटन मावळचे लोकप्रिय खासदार संसद रत्न श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजूभाऊ खांडेभरड,तालुका प्रमुख राजाभाऊ सावंत,पांडुरंग तिखे,तालुका संघटक अंकूश देशमुख, विशाल हुलावळे, शहर प्रमूख संजय भोईर, जेष्ठ समाज सेवक नंदकुमार वाळंज,नामदेवराव डफळ,दत्ता केदारी,नवनाथ हारपूडे,नंदू‌ कडू,ऍड सदाशिव शिंदे,संजय शिंदे, मारुती दादा तिकोने, माजी सभापती चंद्रकात कुडले,उपशहर प्रमुख विशाल पाठारे, मंगेश येवले, विजय आखाडे, अनिता गायकवाड, दिपाली शिरबेकर,सहादू बडेकर,कल्पना आखाडे,कांता मोरे,प्रिया पवार,मनीषा भांगरे,भांगरवाडी शिवसेना विमागाचे सर्व पदाधिकारी, आधार फाऊंडेशनचे सर्व सदस्य जेष्ठ नागरीक संघाचे सदस्य,लॉर्ड बौद्ध संस्थेचे सर्व सदस्य, प्रकाश पाठारे युवा मंच व मित्र परिवार यानी विशेष परिश्रम घेतले.या शिबिरात एकूण ३२ जणांनी रक्तदान केले. नेत्र तपासणी २१० जणानी केली.बीपी, शुगर, हाडाचे कॅलशियम, १९० जणांनी केले, कैन्सर तपासनी ६७ जणांनी केली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page