लोणावळ्यात भरत आगरवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वीज बिल भरणा केंद्राचे उद्घाटन



मावळ मराठा न्यूज:-लोणावळा,लोणावळा भरत आगरवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने लोणावळा व लोणावळा ग्रामीण परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी पतसंस्थेच्या वतीने वीज बिल भरणा केंद्राचे उद्घाटन MSEB चे शिवाजी चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून अध्यक्ष लता भरत आगरवाल यांच्या हस्ते शिवाजी चव्हाण यांच्या सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी, यशवंत पायगुडे, राजाभाऊ दळवी,राजभाऊ खळदकर, रामविलास खंडेलवाल, सुरेश गायकवाड, दत्तात्रय तांदळे,सुंनदा दाभणे हर्षल होगले,अमित गंधे, सुरेश ढोकळे, किशोर भोईर,अजमत खान, पतसंस्थेचे व्यवस्थापक वासंती खिरे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.




