दसऱ्याच्या मुहूर्तावर ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा सुशोभित विस्तारित सभागृह,अन्नपूर्णा सदनाचे लोकार्पण



मावळ मराठा न्युज,तळेगाव,मंडळाचे अध्यक्ष अशोक काळोखे यांनी सर्वांचे स्वागत करून समारंभाचे प्रास्ताविक केल्यानंतर देणगीदार श्री संघवी सुमतीलाल शहा- संघवी,श्रीमती शशिकला विनोद कुमार शहा,माजी प्रांतपाल लायन डॉक्टर दीपकभाई शहा मावळचे कार्यक्षम आमदार सुनील अण्णा शेळके या सर्वांचा यावेळीसन्मान करण्यात आला.सत्कार कार्यवाह श्रीमती स्नेहल रानडे यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांविषयी माहितीदिली. माजी नगराध्यक्ष शशिकला यांनी समयोचित काव्यपंक्तीतून आपल्या शुभेच्छा दिल्यात. लायन डॉ. दीपकभाईनी ज्येष्ठांनी श्रेष्ठत्त्वा कडे जातानाचा प्रवास आनंदमयी कसा होईल? याचा कानमंत्र ज्येष्ठांना दिला. आमदार सुनील आण्णा शेळके यांनी मनोगतात आपण सर्व आदरणीय ज्येष्ठ मंडळी आम्हाला सेवेची संधी देत आहात हे आम्ही आमचं भाग्य समजतो. या सेवेबरोबरच लवकरच आपणास सर्व प्रकारची मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे असे मत आमदारांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कोऑर्डिनेटर – डॉ.भंडारीनी सन्माननीय देणगीदारांच्या प्रति मंडळाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. गणेशपूजन, दीपप्रज्वलन आणि भारतीयांच्या हृदयात आढळस्थान प्राप्त करणाऱ्या रतनजी टाटा यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीने कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. सौ नंदिनी टाळे आणि राधेश्याम भंडारी यांनी उत्तम सूत्र संचलन केले. उपाध्यक्ष सौ आशा जैन,सल्लागार श्री सुधाकर रेम्बोटकर, कोषाध्यक्ष श्री विठ्ठल कदम, श्री विठ्ठल कांबळे, श्री काशिनाथ उंडे, सौ गीता वालावलकर,व्यवस्थापक श्री लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतलेत.




