संपर्क अभिनव इंग्लिश स्कूल व लिली इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न



मावळ मराठा न्युज :- मळवली,संपर्क संस्थेच्या लिली इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळे ग्रुपच्या प्रमुख स्वप्नाली तिडके शिरोळे उपस्थित होत्या दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संपर्क संस्थेचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी यांनी प्रमुख पाहुण्या उद्योजिका स्वप्नाली शिरोळे, उद्योजक रोहित शिरोळे तसेच व्यासपीठावर उपस्थित इटालियन पाहुणे लुसीयांनो कॅमिली, आर्मीदा ट्रॅलडी तसेच यांचा सन्मान केला तर लिली स्कुलचे मुख्याध्यापक चेतन देशमुख यांनी संपर्क च्या विश्वस्त रत्ना बॅनर्जी पालक शिक्षक कमिटीचे उपाध्यक्ष उल्हास मांडेकर व स्वप्ना फाटक तुषार महाराज दळवी यांचा सन्मान केलाविद्यार्थी, पालक तसेच उपस्तिथ पाहून्याचे शाब्दिक स्वागत संस्थेच्या सल्लागार नवनिता चटर्जी यांनी केलेवार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात गणेश वंदना व नृत्याने करण्यात आलीयावेळी प्रास्तविकात अमितकुमार बॅनर्जी यांनी शाळेच्या शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करून उपस्तिथ पालकांचे विशेष आभार मानले.ग्रामीण भागातील या लिली इंग्लिश स्कुल मधील विध्यार्थी व पालकांचा उत्साह पाहुन मी भारावून गेले आहे असे उदगार प्रमुख पाहुण्या उद्योजीका स्वप्नाली शिरोळे यांनी आपल्या भाषणा दरम्यान व्यक्त केले.यावेळी संपर्क संस्थेचे अधिकारी कृष्णा सातार्डेकर, यावेळी जिल्हा पातळीवर व तालुकास्तरावर विविध क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट चमक दाखविलेल्या कु. मानसि साळवे, मृणाल कुडले, अदिती तिकोने, गुडी शिंदे, प्रांजल कानवडे, ऋषिकेश इबदार, कृष्णा साकले, राज तमग, अजय अंकोशी, मृण्मई कालेकर, मंथन साठे, अंकिता घारे या विद्यार्थ्यांचा पाहून्याच्या हस्ते प्रशास्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आलास्नेहसंमेलन दरम्यान अभिनव इंग्लिश मिडीयम स्कुल पाटण व लिली इंग्लिश मिडीयम स्कुल मळवली भाजे येथील विध्यार्त्यांनी विविध कला गुणदर्शन सादर केलेअभिनव स्कुल च्या चिमुकल्या विध्यार्थाच्या नृत्याने उपस्तिथ पाहुणे व पालक शिक्षकांच्या चेहऱ्यावर कौतुकाचा आनंद पाहायला मिळालायावेळी संपर्क संस्थेचे कृष्णा सातार्डेकर, शुभंकर साव, प्रदीप वाडेकर, अभिनव इंग्लिश मिडीयम व लिली इंग्लिश मिडीयम स्कुल व जुनियर कॉलेज चा सर्व शिक्षकवर्ग कर्मचारी वर्ग व पालक वर्ग उपस्तिथ होताकार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका दिव्या गवळी यांनी केले तर आभार मुख्याध्यापकचेतन देशमुख यांनी मानले




