वेहेरगाव येथे भा.ज.पा.महिला मोर्चा अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांच्या वतीने आयुष्यमान विमा कार्ड नोंदणी,१५० ग्रामस्थांना लाभ

मावळ मराठा न्युज :- कार्ला,प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान विमा कार्ड नोंदणी वेहेरगाव येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांच्या वतीने मोफत करण्यात आली. सदर विमा ५ लाखां पर्यंत मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे मत सायली बोत्रे यांनी व्यक्त केले.सदर अभियाना अंतर्गत महिला व पुरुषांनी भरभरून प्रतिसाद दिला १५० नागरिकांनी याचा लाभ घेतला या प्रसंगी वेहेरगावचे ग्रामपंचायत सदस्य पूजा अशोक पडवळ , अनिल गायकवाड, मा.सरपंच दत्तात्रय पडवळ , संतोष रसाळ , महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सचिव जितेंद्र बोत्रे , मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मधुकर पडवळ ,मा. उपसभापती कल्याणी ठाकर , नाणे मावळ महिला मोर्चाचे अध्यक्ष सीमा आहेर ,शिवसेना उपविभाग प्रमुख कैलास पडवळ मा.उपसंरपंच ज्ञानेश्वर बोत्रे, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष निवृत्ती बोत्रे ,पांडुरंग बोत्रे ,सोमनाथ बोत्रे सह ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page