लायन्स क्लब लोणावळा खंडाळा यांच्या वतीने मावळात काऊ ऍम्ब्युलन्स द्वारे जखमी गाईला मिळाले जीवनदान



मावळ मराठा न्युज:- लोणावळा लायन्स क्लब लोणावळा खंडाळा यांनी नुकतेच सुरु केलेले काऊ ऍम्ब्युलन्स द्वारे मुक्या अवजड जखमी जनावरांना तातडीने वैदकीय मदत मिळणे कामी सेवा कार्य सुरु केले असून यास भरघोस प्रतिसाद मिळत आहे . नुकतेच लोहगड किल्ला पवना डॅम जवळ रात्री सुमारे ११.३० वाजता फोन वरून कळाले की जखमी अवस्थेत तोंड व जबडा रक्त भम्बाळ झालेले गाईस तातडीने वैदयकीय सेवेची आवश्यकता आहे हि माहिती मिळताच लायन्स क्लब लोणावळा खंडाळाचे सचीव विरल गाला ऍम्ब्युलन्स चालक विपुल माने यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली असता शेतामध्ये डुक्कर व रानटी जनावराने उभ्या शेतीमाल पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून अन्न बॉम सारखे पदार्थ शेताचे काणे कोपऱ्यात ठेवले जाते अपघाताने सादर गाईने अन्न समजून अन्न बॉम ते प्राशन केले व तो अन्न बॉम तिचे तोंडात विस्फोटाला तिचे तोंड जबडा रक्त भाम्बाळ झाले त्या वेळेस सदर जखमी गाईस सदर काऊ ऍम्ब्युलन्स द्वारे पुणे येथे दवाखाण्यात रात्री २.३० चे सुमारास नेण्यात आले व तेथील उपस्तित पशु डॉक्टरांनी तातडीने औषध उपचार सुरु केला व त्या गाईस नवीन जीवन दान मिळाले याची माहिती लायन्स क्लब लोणावळा खंडाळाचे अध्यक्ष अँड प्रफ्फुल बी. लुंकड यांनी दिली व भविष्यात कुठलेही मोठे व अवजड जखमी जनावरांचे उपचार कमी मदती करता दिलेल्या हेल्प लाईन न वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




