लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज ची उत्कृष्ट कामगिरी,अनेक पुरस्कारांनी सन्मानित








मावळ मराठा न्युज – लोणावळा, लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज च्या अध्यक्षा सुरेय्या वाडीवाला यांच्या अध्यक्षतेखाली क्लबनें वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचेच फलित म्हणून क्लबला अनेक पुरस्कार देखील मिळाले.त्याचाच भाग म्हणून ३ मे २०२६ रोजी पुणे येथे नुकत्याच झालेल्या मोक्ष’ जिल्हा मीटिंग मध्ये , टीम लोणावळा सुप्रीमोज आणि त्यांच्या सदस्यांना ३ प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. १) जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट क्लब पुरस्कार क्लब अध्यक्ष पीएमजेएफ ला.सुरैया वाडीवाला यांच्या हस्ते प्रदान. २) एमजेएफ ला. अमीन वाडीवाला यांना, जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कॅबिनेट अधिकारी पुरस्कार मिळाला.३) आमच्या क्लब अध्यक्ष पीएमजेएफ ला.सुरैया वाडीवाला यांना सदस्य संख्येत २००% वाढ झाल्याबद्दल इंटरनॅशनल प्रेसिडेंट्स मिशनचा १.५ पिन मिळाला. टीम लोणावळा सुप्रीमोससाठी ही एक अभिमानास्पद उपलब्धी आहे. टीम लोणावळा सुप्रीमोसच्या कठोर परिश्रमाची आणि सेवेची दखल घेतल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक आभार त्याचे आभार आणले.



