*लायन्स क्लब लोणावळा-खंडाळाच्या ला. कांता पोपट ओसवाल यांच्या नेतृत्वातील टीमला लायन्स मल्टिपल कन्व्हेन्शनमध्ये मोठे यश*

मावळ मराठा न्युज -दि. १६ मे २०२६ रोजी हर्षल बँक्वेट, कोथरूड, पुणे येथे आयोजित लायन्स मल्टिपल कन्व्हेन्शन विजयोत्सव मध्ये अत्यंत आनंद आणि अभिमानाने आम्ही जाहीर करत आहोत की, *लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा* यांना समाजसेवा आणि समाजाप्रती असलेल्या समर्पणासाठी विविध प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत.*लायन्स क्लब लोणावळा-खंडाळाच्या इतिहासात प्रथमच, लायन कांता पोपट ओसवाल* यांच्या गतिमान नेतृत्वाखाली आणि संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नांतून *लायन्स मल्टिपल कन्व्हेन्शनमध्ये* मिळवलेले हे आमचे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे. प्राप्त पुरस्कार:*• पब्लिक रिलेशन्स अवॉर्ड**• ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड**• परमनंट प्रोजेक्ट अवॉर्ड**• स्क्रॅप बुक अवॉर्ड**• बेस्ट सेक्रेटरी अवॉर्ड* लायन निराली नालेकर * बेस्ट लायन्स कल्ब* हे सर्व पुरस्कार अध्यक्ष लायन कांता ओसवाल यांचया हम साथ एक साथ आणि नवीन थीम एक्टिवी यश संपादन व क्लब मधील प्रत्येक सदस्याच्या कठोर परिश्रमाचे, एकतेचे, सर्जनशीलतेचे आणि सेवाभावाचे प्रतीक आहेत. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक सदस्याचा या यशामध्ये मोलाचा वाटा आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व मान्यवर पदाधिकारी, सदस्य, ॲक्टिव्हिटी चेअरपर्सन्स आणि सहकार्य करणाऱ्या सर्व समर्थकांचे हार्दिक अभिनंदन!डिस्ट्रिक्ट गवर्नर राजेश अग्रवाल व मल्टीपल कन्वेंशन चेयरपर्सन लायन विजय सारडा यांचे मार्गदर्शन मिलाले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page