गुडीपाडवा ते श्री रामनवमी या कालावधीत ‘राष्ट्रसेवा समितीच्या माध्यमातून श्रीरामरक्षा पठण



मावळ मराठा न्युज – लोणावळा,चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच गुडीपाडवा ते श्री रामनवमी या कालावधीत ‘राष्ट्रसेवा समितीच्या माध्यमातून श्रीराम मंदिर भांगरवाडी येथे श्रीराम मंदिर ट्रस्ट च्या सहकार्याने श्रीरामरक्षा पठणाचा उपक्रम घेण्यात आला. या मध्ये श्री गणेश वंदना, श्री दत्तगुरु ना वंदन, श्री भीमरूपी स्तोत्र, श्री रामनाम जप आणि श्री रामरक्षा पठण, रामनाम संकीर्तन करण्यात आले.या साठी सर्व समिती सदस्या व अनेक श्रीराम भक्त नियमित पणे उपस्थित होते.साधारण ५० हून अधिक संख्या दररोज होती.अतिशय भक्तीभावाने,तल्लीन होऊन पठण होतं होते. पवित्र सकारात्मक ऊर्जेची अनुभूती परमेश्वर चरणी येत होती.या पवित्र प्रेरणादायी संकल्पनेने नव वर्षाची सुरवात झाली. हे चैतन्य अखंड मिळो ही श्रीराम चरणी प्रार्थना सर्व महिला भगिनींनी केली.




