अशोकराव उमरगेकर यांची भाजप प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती



मावळ मराठा न्युज :-आळंदी,(अर्जुन मेदनकर),मुंबई येथील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यालयात आळंदी नगरपरिषद माजी नगरसेवक तथा मातंग एकता आंदोलनाचे संघटक अशोकराव उमरगेकर यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात आगामी होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राचे सहप्रभारी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीपराव कांबळे यांनी नियुक्ती पत्र दिले. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुंग, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाशजी, राष्ट्रीय सह संघटन मंत्री व्ही सतीश जी, राष्ट्रीय महामंत्री महंत शंभुनाथ तुंडियाजी माजी मंत्री तथा भाजपा नेते विजय भाई गिरकर, ,प्रदेश उपाध्यक्ष तथा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, अनुसूचित जाती आयोगाचे राष्ट्रीय सदस्य सुभाष पारधी , प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, प्रा पंडित सूर्यवंशी, दिनेश पगारे, धनराज बिरदा, मुबई प्रदेश सरचिटणीस राहुल कांबळे या सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रसंगी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष रामदास भोसले, मंडूबाबा पालवे, बब्रुवान अर्जुने, अर्जुन मेदनकर आदींच्या वंतीने उपस्थित राष्ट्रीय पदाधिकारी यांचा सन्मान वारकऱ्यांचे उपरण आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रदेश सरचिटणीस पदी अशोकराव उमरगेकर यांच्या नियुक्तीने पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चित चांगला परिणाम होणार असून त्यांच्या संघटन कौशल्याने या विभागात विजय मिळवण्यात त्यांचा सहभाग राहणार आहे. पुणे जिल्ह्यातून या निवडीचे स्वागत होत आहे. पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, आळंदी शहर अध्यक्ष किरण येळवंडे यांनी हार्दिक शुभेच्छा देत अभिनंदन केले.




