वडगाव न्यायालयातील विविध समस्यांबाबत वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

मावळ मराठा न्युज :-वडगाव मावळ, दिनांक १६ आॉगस्ट, २०२४ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जनसन्मान यात्रेनिमित्त मावळ तालुका दौरा संपन्न झाला. यावेळी वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.सोमनाथ पवळे व इतर सर्व पदाधिकारी यांनी वडगाव मावळ न्यायालयात वकिल व नागरिकांना येणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी मा. अजितदादांना लेखी निवदन दिले. वडगाव मावळ न्यायालयाची प्रस्तावित ८+२ पार्किंगसह, तसेच १४ गुंठे मध्ये न्यायाधीश निवास, व इमारतीच्या बांधकामास वित्त विभागाची लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष ॲड सोमनाथ पवळे, ॲड विठ्ठल पिंपळे, ॲड मिनाक्षी ढोरे, ॲड अक्षय रौंधळ, ॲड स्नेहा परदेशी, ॲड राम शहाणे आदी वकिल वर्ग उपस्थित होता.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page