राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे वाशीम जिल्हात आगमन
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे वाशीम जिल्हात आगमन होताच, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष , माजी मंत्री तथा भिमशक्ती सामाजिक संघटनेचते संस्थापक, अध्यक्ष मा चंद्रकांतजी हंडोरे साहेब आपल्या कार्यकर्त्यांसह भारतजोड पदयात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
भोजन वेळी राहूलजी गांधी यांनी माननिय चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांना खांद्यावर हात टाकून जवळ घेऊन भारतीय संविधान वाचण्यासाठी आणि खासकरून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न,वाढती बेरोजगारी आणि राज्य सरकारकडून भारतीय संविधानाची पदोपदी होत असलेली अव्हेलना या संबंधी भारतीय संविधान वाचवण्या संबंधित विषयांवर सखोल चर्चा झाली.
यावेळी भीम शक्ती संघटनेचे दिलीप भोजराज , एन. के. कांबळे, संतोष भिंगारे, भाऊ सूरवाडे, शशी कांबळे , मनोज पारधे, सचिन सिरसाट यांचेसह असंख्य पदाधिकारी बहुसंख्येने उपस्तित होते.