वडगाव मावळ पोलीस ठाण्यात अभिलेखावरील गुंड अक्षय विष्णु रिटे याचेवर १ वर्षे स्थानबद्धतेची कारवाई

मावळ मराठा न्युज :- वडगांव मावळ:-वडगांव,वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील गुंड अक्षय विष्णु रिटे वय-२४ वर्षे रा. कुडेवाडा, वडगाव मावळ ता. मावळ जि पुणे यांस मांडों सुहास दिवसे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी सार्वजनिक सुव्यकथेस बाधा निर्माण करणा-या कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी “महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टीवाले औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, घोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीची विनापरवाना प्रर्दशन करणारे व्यक्ती (व्हीडीओ पायरेट्स), वाळुची तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८१ सुधारणा २०१५ ( एम पी.डी.ए अधिनियम) अन्वये येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ०१ वर्षे कालावधीसाठी स्थानबद्ध करणेत आलेले आहेवडगाव मावळ पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील गुंड अक्षय विष्णु रिटे वय-२४ वर्षे रा कुडेवाडा, वडगाव मावळ ता. मावळ जि पुणे याचेवर सन-२०१३ ते २०२४ या कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, दुखापत, विनयभंग आशा असे एकुण ६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन, मागील ५ वर्षामध्ये ४ गुन्हे दाखल असुन, त्याने दाखल गुन्हयामध्ये दरवेळी मा. न्यायालयातुन जामीन घेवून, जामीनावर सुटलेनंतर आपल्या साथिदारांसह नवीन गुन्हे केलेले आहेत. त्याचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्याचे गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीही सुधारणा होत नव्हतीगुंड अक्षय विष्णु रिटे पाने वडगाव मावळ व परिसरामध्ये गुन्हेगारी कारवाया करून स्वतःची दहशत निर्माण करणेचा प्रयत्न केलेला होता. त्याचे गुन्हेगारी कारवाया व वर्तनामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होवुन, सार्वजनिक सुव्यस्थेंस बाधा निर्माण झालेली होती. याची दखल घेवुन पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक मा. पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मा.रमेश चोपडे, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी मा सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कुमार कदम यांनी अक्षय विष्णु रिटे वय-२४ वर्षे याचे विरूद्ध स्थानबद्ध कारवाईसाठी प्रस्ताव सादर केलेला होता.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे कार्यालयाचे मार्फतीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर, पो.हवा महेश बनकर यांनी स्थानबद्ध प्रस्तावाचे कामकाज करून, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठपुरावा केला असुन, वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कुमार कदम, सहा. पोलीस निरीक्षक श्री शितलकुमार डोईजड, संतोष जाधव, सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री सुनिल जावळे पो.हवा अमोल कसबेकर, किरण नांगरे, पो.कॉ गणेश होळकर, सिद्धांत वाघमारे, किरण ढोले यांनी सदरचे प्रस्ताव तयार करणेसाठी विशेष कष्ट घेवुन, सदरची कारवाई पुर्णत्वास आणलेली आहे वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील सार्वजनिक सुव्यवस्थेंस बाधा निर्माण करणारे, बेकायदा शस्त्र बाळगणारे गुंड, स्वतःची दहशत निर्माण करणा-या व सर्वसामान्य नागरीकांना त्रासदायक गुंडांची यादी अदयावत करण्यात आलेली असुन, यापुढील काळामध्ये अशा गुंडांवर एम.पी.डी.ए सारखी प्रभावी कारवाई करून मावळ तालुक्यातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडणार आहे.अशी माहिती वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page