डॉ. राजू पांचाळ “भारत सन्मान निधी पुरस्काराने सन्मानित

मावळ मराठा न्युज :-पिंपरी(प्रतिनिधी) इन्स्टिट्यूट फॉर सोशल रेफॉर्मस अँड हाय एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये भारत सन्मान निधी पुरस्कार डॉ राजू पांचाळ यांना प्रदान करण्यात आला. डॉ राजू पांचाळ यांनी पत्नी डॉ.जागृती, पांचाळ,कन्या इच्छा पांचाळ यांच्यासह स्वीकारलाहा पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथील दिल्ली विधानसभा या ठिकाणी संपन्न झाला .दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल, सचिव राजकुमार अग्रवाल, आयएसआरएचइ चे अध्यक्ष डॉ अतुल कुमार शर्मा,सचिव रेणू गुप्ता, रामनिवास गोयल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.डॉ राजू पांचाळ हे गेली १५ वर्षापासून ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. या व्यतिरिक्त त्यांनी दीडशेहून अधिक शाळा महाविद्यालयातील चाळीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास का? व कसा करावा? स्वतः विकसित केलेल्या विषयावर ते मार्गदर्शन करीत आहे. या कार्याचा गौरव म्हणून दिल्ली येथे त्यांना भारत सन्मान निधी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या पुरस्कार प्राप्तीबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत,राजर्षी शाहू इंजीनियरिंग कॉलेजचे संचालक डॉ. राकेश जैन,उपसंचालक डॉ.अविनाश देवस्थळी, ताथवडे शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रा सुधीर भिलारे,रवी सावंत यांनी अभिनंदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page