अजित पवार मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले तर त्यांचा वेगळा विषय हाती घ्यावा लागेल -जरांगे पाटील

मावळ मराठा न्युज,“जर इथून पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले तर त्यांचा वेगळा विषय हाती घ्यावा लागेल असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्याचबरोबर, पहिल्यापेक्षा या दौऱ्यामध्ये लोकांचा पाठिंबा वाढला आहे. जास्त दिवस झाल्यानंतर आंदोलनाची धार कमी होते मात्र या दौऱ्यात लोकांचा पाठिंबा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत अजूनही कोणताच तोडगा निघालेला नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील हे २० जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत. जरांगे पाटील यांच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाहीजा ठेवायचा नाही अशी टीका अजित पवार यांनी केली होती. आता त्यांच्या या टिकेला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page