उल्लेखनीय कार्य करून देखील भगिनी निवेदिता यांचेवर धर्म मार्तंडांनी टीका केली – प्रा जोशी

मावळ मराठा न्यूज,पिंपरी (प्रतिनिधी) आपल्या देशाच्या राजकीय, सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबेल म्हणजेच भगिनी निवेदिता यांच्या कार्याचे स्मरण होणे गरजेचे आहे. त्यांनी भारतीय समाज जीवनात सर्व क्षेत्रात कार्य करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला.तरी देखील आपल्या देशातील धर्म मार्तंडांनी टीका करीत तोंडसुख घेतले.असे प्रतिपादन मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केले.शरद नगर चिखली येथील स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त, स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवशीय व्याख्यानमालेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी “स्वामीजींच्या शिष्या भगिनी निवेदिता” यांच्याविषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले.यावेळी साई हायस्कूलचे संचालक शिवलिंग ढवळेश्वर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नागरगोजे, निलेश नेवाळे,राजेंद्र घावटे, देवराम मेदनकर , प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे आदी उपस्थित होते.प्रा जोशी पुढे म्हणाले कि, जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेत सर्वधर्मपरिषदेत बोलण्याच्या ओघात “भारतीय स्त्रिया बुद्धिवान आहे. मात्र त्यांना चाली- रूढी परंपरेच्या जोखडातून मुक्त करण्याची आवश्यकता आहे. मार्गारेट या स्वामींच्या विचाराने प्रेरित होवून त्यांनी भारतातील स्त्रियांसाठी कार्य करण्याचा हट्ट स्वामींकडे धरला.शेवटी त्यांच्या ३६ सहकारी महिलांसोबत भारतात आल्याच. आपल्या देशात येवून त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि भगिनी निवेदिता नामकरण झाले.त्यांनी लोकमानस व लोककला समजून घेतली. भगिनी निवेदिता यांनी “काली द मदर” या विषयावर कोलकता येथे व्याख्यान दिले.भारतीय स्वातंत्र्यलढा तीव्र होत असताना बंगालची फाळणी झाली.त्यांनी काही रवींद्रनाथ टागोर व बोस यांच्या पुस्तकाचे अनुवाद केले.प्लेगच्या साथीमध्ये आलेल्या गोऱ्या गोमट्या उच्च विभूषित महिलांनी भारतीयांची स्वच्छतेच्या माध्यमातून सेवा केली.त्यांनी मुलींसाठी शाळा, कुमारी माता व विधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य केले.यावेळी भारतातील धर्ममार्तंडांनी त्यांच्यावर टीका करीत तोंडसुख घेतले.भगिनी निवेदिता यांनी चाफेकर बंधूंच्या मतोश्रींचे सांत्वन करण्यासाठी पुण्यात आल्या होत्या यावरून त्यांचे पुणे कनेक्शन लक्षात येते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामराजे बेंबडे यांनी केले.सूत्रसंचालन संतोष ठाकूर तर आभार मिलिंद वेल्हाळ यांनी मानले.कार्यक्रम आयोजनासाठी सुनील पंडित, महेश मांडवकर, संतोष ठाकुर, शंकरराव बनकर, पंढरीनाथ म्हस्के, सुनील खंडाळकर, दिलीप मांडवकर,अशोक हड़के, सिद्धराम मालगत्ती यांनी पुढाकार घेतला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page