कांचन भिसे व योगेश खरात या नवविवाहित दांपत्याच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून सुखी संसाराची सुरुवात



मावळ मराठा न्युज :-पिंपरी – प्रतिनिधी, सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे व क्रांतीगुरु वस्ताद लहूजी साळवे या महापुरुषांच्या पुतळ्यास जेष्ठ नेते मोहन भिसे यांची कन्या कांचन व दिपक खरात यांचे चिरंजीव योगेश यांचा विवाह रविवार दिनांक १७-३-२०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. नवविवाहित कांचन व योगेश यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यात आली.यावेळी सकल मातंग समाज समन्वयक प्रमुख डी पी खंडाळे, पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, प्रदेश समन्वयक युवराज दाखले, रामदास कांबळे, आबासाहेब मांढरे,अविनाश शिंदे,मोहन भिसे, गणेश कलवले, मंगेश डाखोरे, वसंत वावरे,मोहन भिसे,राजु आवळे, सरपंच नानासाहेब कांबळे,आदी प्रमुख समाज बांधव उपस्थित राहुन नवविवाहित दांपत्य यांना शुभ आशीर्वाद दिले.नवविवाहित कांचन भिसे व योगेश खरात यांनी वैवाहिक जीवनाची केलेल्या सुरूवातीची कौतुक सर्व समाज बांधवांनी केले तसेच पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.




