तळेगांव येथील मधू मालती सोसायटी मधील डॉ ढाकेफाळकरयांनी आपले ज्योती नर्सिंग होम बंद करण्याची महेश मते यांची मागणी

मावळ मराठा न्यूज,तळेगांव:-तळेगांव येथील मधू मालती सोसायटी ,पंचवटी येथील रहिवाशी इमारतीत डॉ ढाकेफाळकर यांनी आपले ज्योती नर्सिंग होम हे बेकायदेशीर व अवैध रित्या दवाखाना चालवीत असल्याची तक्रार त्याच सोसायटीमध्ये राहणारे महेश मते यांनी येथील सहाय्यक निबंधक वडगाव मावळ,प्राथमिक आरोग्य केंद्र,तळेगाव नगरपरिषद,तळेगाव पोलीस स्टेशन यांचेकडे दिनाक ४ जानेवारी रोजी लेखी तक्रार केली आहे,नागरिकांचा आरोग्याचा विषय असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे यांनी सदर विषयाची गांभीर्याने दखल घेत ५ जानेवारी रोजी सदर ठिकाणची प्रत्यक्ष जावून पाहणी केली असता त्यात अनेक त्रुटी आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यात डॉ. ढाकेफळकर यांचेकडे मेडिकल कॉन्सिल चे प्रमाणपत्र आढळून आले नाही,तळेगांव नगरपरिषदेचे ना हरकत घेतले नाही,रहिवाशी सोसायटी असलेल्या मधू मालती सोसायटीचे देखील ना हरकत घेतले नसल्याचे आढळून आले आहे. आपल्या समोरील पाण्याचा टाकी समोर औषधांची पाकिटे आढळून आली तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याचे प्रथमिक आरोग्य केंद्राच्या स्थळ पाहणी वेळी आढळून आले.विशेष म्हणजे डॉ ढाकेफळकर हे त्या सोसायटीचे चेअरमन आहेत.त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप अर्जदार मते यांनी आपल्या संबंधितांना दिलेल्या निवेदनात केला आहे.तरी त्वरित दवाखाना बंद करण्यात यावा,नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये अन्यथा उपोषण करून आंदोलनाचा इशारा महेश मते यांनी दिला आहे.




