लायन्स क्लब ऑफ़ निगडीच्या महिलांसाठी आयोजित स्तन कर्करोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


मावळमराठा न्युज:- निगडी,शाहूनगर लक्ष्मी मंदिर व आस्था हॉस्पिटल स्पाईन रोड शिवतेजनगर येथे दोन्ही ठिकाणी स्तन कर्करोग निदान(ब्रेस्ट कॅन्सर) तपासणी शिबिरे सरिता सोनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. त्यामध्ये एकूण २५३ महिलांची तपासणी मोफत करण्यात आली .त्यापैकी १८ महिलां बाधित आढळून आल्या व त्यांना पुढील तपासणीसाठी जाण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरास सलीम शिकलगार, प्रदीप ढोकरे, गीतांजली ढोकरे , एमजेएफ हर्ष नायर, सी बी पवार , संजय निंबाळकर डॉ दिलीपसिंह मोहिते उपस्थित होते.




